कर्जमाफीची रक्कम एक फेब्रुवारीपासून खात्यावर  

कर्जमाफीच्या योजनेत सहकारी बॅंकाची यंत्रणा गुंतल्यामुळे जिल्हा बॅंका आणि सहकारी सोसायट्या यांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
balasaheb patil on loan waiving
balasaheb patil on loan waiving

कऱ्हाड : महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेची रक्कम लिंकींगच्या माध्यमातुन एक फेब्रुवारीपासुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास प्रारंभ होईल. दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्याचबरोबर नियमीत शेतकऱ्यांसाठीही लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.

सह्याद्री कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता कर्जमाफीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा व्हावे यासाठी सरकारने महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. त्या योजनेची रक्कम लिंकींगच्या माध्यमातुन एक फेब्रुवारीपासुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास प्रारंभ होईल. त्याचबरोबर जे नियमीत कर्जदार आहेत त्यांच्यासाठीही शासनाने निर्णय घ्यायचा ठरवले आहे. त्यासाठी मंत्र्यांच्या उपसमिती नेमली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मी, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, दादाजी भुसे अशा आमच्या सहा मत्र्यांचा समावेश आहे. त्या समितीची पहिली बैठक झाली आहे. लवकरच नियमीत कर्जफेड करणाऱ्यांनाही न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान या कर्जमाफीच्या योजनेत सहकारी बॅंकाची यंत्रणा गुंतल्यामुळे जिल्हा बॅंका आणि सहकारी सोसायट्या यांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com