शंभूराजेंना हवे होते ते बाळासाहेब पाटलांना मिळाले!

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसेनेचाच जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळणार हे निश्‍चित वाटत होते. त्यासाठी पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाईंचे नाव पुढे होते. शंभूराज देसाई हे कडक स्वभावाचे असून ते अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक ठेऊ शकतील. तसेच या पदाला सजेसे काम त्यांच्याकडून होईल, असे सर्वांना वाटतहोते
Balasaheb Patil Gets Satara Guardian Minister Post instead of Shambhuraje Desai
Balasaheb Patil Gets Satara Guardian Minister Post instead of Shambhuraje Desai

सातारा : जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे पाटणचे आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना मिळेल, असे सर्वांना वाटत होते. त्यांच्या पाटण मतदारसंघातील समर्थकांनीही पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावरच पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवत हे पद आल्याकडेच ठेवले आहे.

भाजप, शिवसेना युतीच्या काळात साताऱ्याचे पालकमंत्रीपद हे शिवसेनेच्या वाट्याला आले होते. त्यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे साताऱ्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्यांच्या काळात जिहे-कठापूर योजनेला निधी मिळण्याबाबत त्यांनी प्रयत्न केला. मात्र, शिवसेना पक्ष संघटनेकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाहीत. तसेच ते केवळ कार्यक्रम व बैठकांसाठीच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असत. त्यामुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठविली जात होती. त्यानंतर झालेल्या सत्ता बदलात शिवसेनेसोबत कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली. 

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसेनेचाच जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळणार हे निश्‍चित वाटत होते. त्यासाठी पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाईंचे नाव पुढे होते. शंभूराज देसाई हे कडक स्वभावाचे असून ते अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक ठेऊ शकतील. तसेच या पदाला सजेसे काम त्यांच्याकडून होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, पालकमंत्री पदाच्या काल रात्री झालेल्या निवडीत शंभूराज देसाईंकडे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले. तर साताऱ्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कऱ्हाड उत्तरचे आमदार व सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे दिले आहे. 

त्यामुळे शंभूराज देसाईंना जे हवे होते, ते बाळासाहेब पाटलांना मिळाले. आता जिल्ह्याच्या विकासाची रूतलेली गाडी पुन्हा रूळावर चढवून तीचा वेग वाढविण्याचे काम मंत्री पाटील यांना करावे लागणार आहे. शांत व मितभाषी असलेले बाळासाहेब पाटील हेही पालकमंत्री पदाला योग्य न्याय देतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांतून व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com