शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद - बाळासाहेब पाटील

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद - बाळासाहेब पाटील

कराड : शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून 100 दिवसाच्या आत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सहकार चळवळीला बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज अर्थसंकल्पावर दिली. 

" एक वेळ समझोता योजना ' 
दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2015 ते दिनांक 31 मार्च 2019 या कालावधीत घेतेलेल्या पीक कर्ज, पीक कर्जाचे पुनर्गठित केलेले कर्ज यांचे मुद्दल व व्याजासह रूपये 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता योजना ( one time settlement) म्हणून दिनांक 30 संप्टेबर 2019 रोजी थकबाकी कर्जापैकी शासनाकडून रूपये 2 लाखाच्या रक्कमेचा लाभ देण्यात येईल. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना रूपये 2 लाखांवरील त्यांच्या वाट्याची संपूर्ण रक्कम बॅंकेत जमा केल्यावर शासनाकडून रूपये लाख लाभाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल. 
पन्नास हजाराची प्रोत्साहन रक्कम 
सन 2017 - 2020 या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत पुर्णता: नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना सन 2018 - 19 या वर्षात घेतलेल्या पीककर्जाच्या रक्कमेवर जास्तीजास्त रूपये 50 हजार प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येईल. तसेच सन 2018 - 19 या वर्षात घेतलेल्या व त्यांची पुर्तता: परतफेड केलेल्या पीक कर्जाची रक्कम रूपये 50 हजार रूपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018 - 19 या वर्षात प्रत्यक्ष कर्ज घेतलेल्या पीक कर्जाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. 

अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करून कर्जमाफीसाठी एकूण 22 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं कामही सुरू आहे. ऊसाची शेती पूर्णपणे ठिंबक सिंचनाखाली आणणे हे राज्याचे लक्ष आहे. ऊसासह इतर पिकांच्या ठिंबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान दिले जात होते. ठराविक तालुक्‍यातील ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. बळीराजाला पुन्हा सुगींचे दिवस यावेत यासाठी शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्तच नाही, तर चिंतामुक्त करण्यासाठी शासनाने भरीव अशी अर्थसंकल्पात तरतुद केली आहे. असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com