balasaheb-taware
balasaheb-taware

पोलिस बंदोबस्तात`माळेगाव`चा पदभार बाळासाहेब तावरेंकडे

माळेगाव कारखान्याची सत्ता अखेरीस राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ताब्यात आली...

माळेगाव : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये `माळेगाव`चे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी कारखाना प्रशासकिय पदभार आज स्वीकारला. विशेषतः ही प्रक्रिया पुर्णत्वाला येईपर्यंत पोलिसांनी कारखाना कार्यस्थळावर मोठा बंदोबस्त ठेवला होता. मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत माझ्या संचालक मंडळाचा कार्यकाळ आहे, असा दावा केल्याने सत्ताधारी व विरोधकात परस्परविरोधी तणाव निर्माण झाली होती. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये (२५ फेब्रूवारी २०२०) राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनल १७ विरुद्ध ४ जागांच्या फरकांनी विजयी झाला होता. त्यानुसार ८ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी शहाजीराज हिरे यांनी नवनिर्वाचित संचालकांच्या घेतलेल्या बैठकीत बाळासाहेब तावरे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी तानाजी कोकरे यांची बिनविरोध निवड झाली होती. परंतु मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांच्या संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ (४ एप्रिल) संपेपर्यंत त्यांच्या कारभारात कोणीही हस्तक्षेप करता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. तावरे, उपाध्यक्ष श्री. कोकरे यांना आपला कार्यभार घेण्यासाठी एक महिन्याची प्रतिक्षा करावी लागली.

पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. त्यानंतरच सारे सत्तांतर पार पडले. बाळासाहेब तावरे यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर सर्वाधिक काळ (१४ वर्षे) काम केल्याची नोंद आहे. साखर धंद्यातील अनुभव व संचालकांच्या सहकार्याने सभासदांना सर्वाधिक ऊस दर देण्याचा माझा प्रयत्न राहिल. त्यासाठी शरद पवार, अजित पवार यांचे मार्गदर्शन महत्वपुर्ण ठरेल, असे तावरेंनी  सांगितले. यावेळी संचालक केशवराव जगताप, मदनराव देवकाते, अनिल तावरे, योगेश जगताप, नितीन सातव, सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, संगिता कोकरे, तानाजी देवकाते आदींनी शिल्लक उसाबाबत आक्रमक भूमिका मांडली. 

उर्वरित उसाचे गाळप करणार...! 
माळेगाव कार्यक्षेत्रात अद्याप एक लाख टन ऊस गाळपाअभावी उभा आहे. कोरोना व्हायरसचा धोका, वाढती उष्णाता, ऊस तोडणी मजूरांना घरी जाण्याची ओढ विचारात घेता शिवारातील उभ्या उसाची चिंता शेतकऱ्याना आहे. त्यानुसार अध्यक्ष बाळासाहेब तावरेंनी लागलीच संचालक व प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उर्वरित ऊस गाळप उरकण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com