बाळापुर मतदारसंघाची जबाबदारी आमदार रणधीर सावरकरांकडे

या सर्व घडामोडीत सत्ताधारी भाजपकडून ग्राऊंड लेव्हलवर मोर्चेबांधणी करून बुथप्रमुख, कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका लावून विधानसभेची तयारी करण्यात येत आहे. तर भाजपच्या कोणत्याही हालचालीवर लक्ष ठेऊन असलेल्या शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्याकडून पारस विद्युत प्रकल्पाच्या मुद्यावर आंदोलनाचे रान पेटवून सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे.
 बाळापुर मतदारसंघाची जबाबदारी आमदार रणधीर सावरकरांकडे

अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बाळापूर मतदार संघात विजयी पताका पडकविण्यासाठी या मतदार संघाचे प्रभारी म्हणून भाजपचे तडफदार आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. रणधीर सावकरांच्या अशा प्रवेशामुळे या मतदार संघात मोठी उलता-पालत होणार असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. 

राज्यात 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला भाजपने आतापासूनच सुरवात केली आहे. शहरासह ग्रामीण भागात संघटन अधिक मजबुत करीत बुथ प्रमुखांच्या नियुक्‍त्या, त्यांना प्रशिक्षण देऊन विधानसभेचा गड सर करण्याची जोरदार तयारी भाजपने केली आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहता भाजपचा कट्टर विरोधक म्हणून भारिप बहुजन महासंघाकडे पाहिले जाते. 

जिल्ह्यात सध्या भारिप-बमसंचा एकमेव बाळापूर मतदार संघावर ताबा असून आमदार बळीराम सिरस्कार या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना मैदानात उतरविले होते. मात्र, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने मतविभाजनाचा फटका भाजपला बसला होता. 

या मतदार संघातील राजकीय गणित पाहता भारिप बमसं, भाजप, शिवसेना, शिवसंग्राम, कॉंग्रेस पक्षाचे कमी-अधिक प्रमाणात प्राबल्य आहे. कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदार संघात सध्या कॉंग्रेसची वाट बिकट झाली आहे. भारिप-बमसंमध्येही गटा-तटाचे राजकारण वाढल्याने अतंर्गत धुसफूस सुरूच आहे. त्या तुलनेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी या मतदार संघासाठी जोरदार फिल्डिंग लावली असून विविध आंदोलने, मोर्चे काढून त्यांनी वातावरण निर्मिती केली आहे. 

या सर्व घडामोडीत सत्ताधारी भाजपकडून ग्राऊंड लेव्हलवर मोर्चेबांधणी करून बुथप्रमुख, कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका लावून विधानसभेची तयारी करण्यात येत आहे. तर भाजपच्या कोणत्याही हालचालीवर लक्ष ठेऊन असलेल्या शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्याकडून पारस विद्युत प्रकल्पाच्या मुद्यावर आंदोलनाचे रान पेटवून सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे. 

या सर्व घडामोडी लक्षात घेता बाळापुर विधानसभेचा गड सर करण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी आमदार सावरकर यांच्याकडे या मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. आमदार सावरकर हे अभ्यासू आणि तडफदार आमदार म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची क्रेझ आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या मुसद्देगिरीचा फायदा पक्षाला करून घेण्याच्या दृष्टीने पक्षपातळीवर हालचाली सुरू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com