मावळचा सस्पेन्स अखेर संपला बाळा भेगडेंना पुन्हा उमेदवारी; पडळकर अजित पवारांविरोधात

मावळातील भाजपच्या उमेदवारीचा सस्पेन्स अखेर बुधवारी रात्री संपला. भाजपच्या दुसऱ्या यादीत मावळचे आमदार व कामगार व पर्यावरण राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे भाजपकडून मावळात पहिल्यांदाच एखाद्याला सलग तिसऱ्यांदा विधानसभेची उमेदवारी देण्याचा विक्रम झाला आहे.
Bala Bhegde - Gopichand Padalkar
Bala Bhegde - Gopichand Padalkar

पिंपरी : मावळातील भाजपच्या उमेदवारीचा सस्पेन्स अखेर बुधवारी रात्री संपला. भाजपच्या दुसऱ्या यादीत मावळचे आमदार व कामगार व पर्यावरण राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे भाजपकडून मावळात पहिल्यांदाच एखाद्याला सलग तिसऱ्यांदा विधानसभेची उमेदवारी देण्याचा विक्रम झाला आहे.

दरम्यान,भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे,तर, केजमध्ये अपेक्षेनुसार भाजपच्या विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना भाजपने तिकिट दिले आहे.

उमेदवारीची हॅटट्रिक झालेल्या भेगडे यांना आमदारकीचीही हॅटट्रिक करून मावळात इतिहास निर्माण करण्याची संधी चालून आली आहे. सव्वाशे उमेदवारांची परवाच्या भाजपच्या पहिल्या यादीत भेगडेंचे नाव नसल्याने मावळात उमेदवारीचा सस्पेन्स निर्माण झाला होता. तो आज संपला. आजच्या १४ जणांच्या यादीत भेगडेंचे नाव आल्याने त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यामुळे पक्षाकडून इच्छुक असलेल्या इतर दोघांचा हिरमोड झाला आहे.तरीही त्यातील एक सुनील शेळके हे उद्या मोठे शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी दाखल करणार आहेत. त्यामुळे मावळात बंडखोरी होण्याची शक्यता बळावली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com