bala bhegade lost by more than one lakh votes | Sarkarnama

कॅबिनेट मंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्या बाळा भेगडेंनी कालपासूनच फोन बंद ठेवला होता....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पुणे : मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे कमळ तब्बल 25 वर्षानंतर कोमोजले असून  येथे राष्ट्रवादीच्या घड्याळावर सुनील शेळके हे तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले.

शेळके हे मूळचे भाजपचे होते. त्यांनी या वेळी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना ती न मिळाल्याने ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. भेगडे यांना गेल्या वेळच्या दुप्पट मताधिक्य मिळाल्यास त्यांना कॅबिनेट मंत्री करणयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ते भेगडे यांचे स्वप्न आता विरले आहे. त्यांचे राज्यमंत्रिपदही केवळ तीन ते चार महिन्यांचे ठरले.

शेळके यांच्याबद्दल एक सुप्त लाट मावळ मतदारसंघात असल्याचे या निकालामुळे दिसून आले. भाजपचा हा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पक्षाचा उमेदावर पराभूत होणे अशक्य असल्याचे मानले जात होते. राष्ट्रवादीत येथे प्रचंड भांडणे असल्याने या पक्षाचा उमेदवार नेहमीच पराभूत होत होता. या वेळी मात्र सगळे उलटे घडले. भेगडे यांना या निकालाची धास्ती जाणवत होती. त्यांनी कालपासूनच आपला फोन स्वीच आॅफ करून ठेवला होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांनाही कॅबिनेटची आॅफर सासवडच्या सभेत दिली होती. मात्र त्यांचाही पराभव झाला. योगेश टिळेकर यांना विजयी करा, त्यांना मंत्री करतो, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले होते. त्यांनाही पराभूत व्हावे लागले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख