bakoriya | Sarkarnama

दारूची दुकाने पाहिजेत की शहरासाठी रस्ते - बकोरिया

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्यात आले आहेत. पण शहरातून जाणारे हे मार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करून दारूच्या दुकानांना अभय देण्यासाठी राजकारण्यांसह हॉटेल व्यावसायिक कामाला लागले आहेत. राजकीय वजन वापरत रस्ते हस्तांतरण करण्याचा निर्णय महापालिकेला भाग पाडण्याची तयारी सुरू असतानाच महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मात्र दारूची दुकाने पाहिजेत की, शहरातील रस्त्यांसाठी मिळणारे 1 हजार कोटी? असा सवाल केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

दारूची दुकाने वाचवण्यासाठी शहरातून जाणारे पाच महामार्ग महापालिकेने हस्तांतरित करून घेतले तर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी 17 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. एवढा आर्थिक बोजा महापालिका सहन करू शकणार नाही. शिवाय शहरातून जाणाऱ्या पाच महामार्गांसाठी मिळणाऱ्या 1 हजार कोटी रुपयांवर देखील पाणी सोडावे लागेल. ज्यातून पाच महामार्गाच्या 35 किलोमीटरचे काम होणार आहे. हॉटेल व्यावसायिकांनी रस्ते हस्तांतरित करून घेण्यासाठी माझी भेट घेतली आहे. पण मला त्याही पेक्षा शहरासाठी मिळणारे 1हजार कोटी महत्त्वाचे वाटतात असे बकोरिया यांनी स्पष्ट केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख