बजरंग सोनवणेंनी सॅनिटायझरचा पहिला लॉट पोलिसांना दिला

बजरंग सोनवणेंच्या येडेश्वरी साखर कारखान्यावर सॅनिटायझरचे उत्पादन सुरु झाले आहे. या उत्पादनाचा पहिला लाॅट त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना दिला
Bajrang Sonawne Gave First lot of Sanitizers to police
Bajrang Sonawne Gave First lot of Sanitizers to police

बीड : कोरोना विषाणूचा फैलाव सुरु झाला आणि सॅनिटायझर, मास्कचा तुडवडा सुरु झाला. मात्र, जिल्ह्यात आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी कारखान्यात सॅनिटायझरचे उत्पादन सुरु झाले आहे. या उत्पादनातील पहिला लॉट त्यांनी पोलिसांना भेट दिला.

पोलिसांचा नित्याने लोकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे पोलिसांना स्वत:ची आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी त्यांनी पहिला लॉट पोलिसांना दिला. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर निकडीचे आहे. पंरतु, या विषाणूचा फैलाव सुरु होताच मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला. या आवश्यक दोन्ही वस्तूंची चढ्या भावाने विक्रीही सुरु झाली. दरम्यान, बनावट सॅनिटाझर बाजारात आल्याचे प्रकारही सुरु झाले आहेत. 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सॅनिटायझरमध्ये महत्वाचा आवश्यक घटक अल्कोहोल आहे. मात्र, बाजारात हा घटक नसलेले सॅनिटायझरही आले आहेत. याला पर्याय म्हणून सरकारने साखर कारखान्यांतून सॅनिटायझर निर्मितीची घोषणा केली. जिल्ह्यात बजरंग सोनवणेंनीही त्यांच्या येडेश्वरी कारखान्यात सॅनिटायझर उत्पादनाचा निर्णय घेतला आणि त्याची मागच्या आठवड्यात सुरुवातही केली. रविवारी उत्पादनाचा पहिला लॉट आला आणि त्यांनी त्याचे पोलिसांना वाटप केले. या घटकाचा नित्याने लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी वाटप केल्याचे बजरंग सोनवणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com