bajoriya and sawant | Sarkarnama

अरविंद सावंतांकडून पक्षशिस्त शिकण्याची माझ्यावर वेळ आलेली नाही - गोपीकिशन बाजोरिया

श्रीकांत पाचकवडे
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

अकोला : शिवसेनेची शिस्त मला शिकविण्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांचे शिवसैनिक आहोत. माझ्यावर कारवाई करण्याच्या धमक्‍या अरविंद सावत यांनी देऊ नये. जर खासदार अरविंद सावंत पक्षशिस्त शिकवित असतील तर तो त्यांचा बालीशपणा असल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला. 

अकोला : शिवसेनेची शिस्त मला शिकविण्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांचे शिवसैनिक आहोत. माझ्यावर कारवाई करण्याच्या धमक्‍या अरविंद सावत यांनी देऊ नये. जर खासदार अरविंद सावंत पक्षशिस्त शिकवित असतील तर तो त्यांचा बालीशपणा असल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला. 
गेल्या 17 वर्षांपासून मी शिवसेनेचा आमदार आहे. विधानपरिषदेत मी त्याला सिनिअर होतो. आम्ही बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला अरविंद सावंत यांच्याकडून पक्षशिस्त शिकण्याची गरज नाही. असे बालीशपणाचे बोलून खासदार सावंत हे बेशिस्तपणाचे वागत आहेत. मला कारवाईच्या ते देत असतील आता मला काही तरी विचार करावा लागले, असा इशारा आमदार बाजोरिया यांनी यावेळी दिला . 

 

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना "मायेचा हाथ' या कार्यक्रमातंर्गत सोमवारी शिवसेनेकडून धान्य, साळी-चोळी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे येणार होते. मात्र, प्रवासाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे आदित्य ठाकरे कार्यक्रमास उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील युवासेनेचे शेकडो पदाधिकारी नाराज झाले होते. 

आमदार बाजोरिया यांच्या निवासस्थानी युवासेनेचे सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते जमा झाले. तुम्ही नाराज होऊ नका, लवकरच आदित्य ठाकरे यांचा अकोल्यात मोठा कार्यक्रम घेऊ, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न आमदार बाजोरिया यांनी केला. शिवसैनिकांची समजूत काढण्यात वेळ लागल्याने आमदार बाजोरिया नियोजीत कार्यक्रमात जावू शकले नाहीत. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीवर शिवसेनेचे पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी निशाणा साधला. 

आमदार बाजोरिया यांनी पक्षशिस्त पाळली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिला. खासदार सावंत यांनी केलेल्या वक्तव्याचा आमदार बाजोरिया यांनी शिवसेना स्टाईलनेच समाचार घेतला. अरविंद सावंत हे माझे मित्र आहेत. मात्र, पक्षशिस्त आणि कारवाईचे इशारे ते देत असतील तर त्यांचे ते बोलणे बालीशपणाचे आहे. 

आदित्यजी या कार्यक्रमात येवू न शकल्याने युवासेनेचे सर्व पदाधिकारी व युवासैनिक नाराज झाले होते. जिल्ह्यातील पक्षाचा आमदार म्हणून त्यांचे समजूत काढणे आपले कर्तव्य असून तेच आपण केले. युवासेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमासाठी बोलावले नाही. त्यांना कार्यक्रमात सक्रीयपणे काम करू दिले नाही म्हणून त्यांची नाराजी अधिक वाढली. काही दोन-चार पदाधिकारीच स्वतःचा मोठेपणा मिरवित असतील तर इतर पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी कसे काम करावे, असा प्रश्नही आमदार बाजोरिया यांनी उपस्थित केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख