bail application of moze rejected | Sarkarnama

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पुणे ः कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवत खोटे कागदपत्र तयार करून महिला शिक्षिकेची बदनामी केल्याप्रकरणी माजी आमदार रामभाऊ मोझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी हा आदेश दिला.

योग्यता संदीप पठारे (रा. वडगाव शेरी) यांनी याबाबत जुलै 2017 साली लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोझे, गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन चंद्रकांत मोहीरे आणि संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या फार्मसी कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या होत्या. प्रसूती रजेनंतर त्यांनी पुन्हा कामावर रुजू करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांची पूर्वीच एका को-या लेटरपॅडवर तारखा न टाकता सह्या घेतल्या होत्या. त्याआधारे फिर्यादी यांना सप्टेंबर 2014 नंतर सेवा समाप्तीचे पत्र देण्यात येणार असल्याचे शासकीय कार्यालयांना दिले, असे फिर्यादीत नमूद आहे.

मोझे यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे असून ते तपासात सहकार्य करीत नाहीत. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळावा असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख