Baglan Ex MLA Sanjay Chavan Toll issue | Sarkarnama

तुम्ही आमदार वाटत नाही, गुपचुप टोल भरा....

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

माजी आमदार संजय चव्हाण दोन वेळा बागलाणचे आमदार होते. सध्या त्यांची पत्नी दीपिका चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. आज सकाळी शासकीय कामानिमित्त काही पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी संजय चव्हाण निघाले होते. पिंपळगाव बसवंत टोल नाका येथे त्यांचे वाहन वारंवार ओळखपत्र दाखवूनही सोडले जात नव्हते.

नाशिक : टोल नाक्‍यांवरील वाद विवाद राज्यभर चर्चेत असतात. सामान्यांना कोणीच दाद देत नाहीत. मात्र, बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनाही त्याची झळ बसली. विविध ओळखपत्रे दाखवूनही टोल नाक्यावरची महिला कर्मचारी 'तुम्ही आमदारांसारखे दिसत नाही' असे चव्हाण यांना सांगत राहिल्या. शेवटी तर उध्दटपणे "मी सांगते ना, तुम्ही आमदार वाटतच नाहीत. त्यामुळे गुपचूप टोल भरा' असेही या महिला कर्मचाऱ्याने चव्हाण यांना सुनावले. अखेर मध्यस्थी करीत टोल चालकांनी चव्हाण यांची माफी मागीतली. 

माजी आमदार संजय चव्हाण दोन वेळा बागलाणचे आमदार होते. सध्या त्यांची पत्नी दीपिका चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. आज सकाळी शासकीय कामानिमित्त काही पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी संजय चव्हाण निघाले होते. पिंपळगाव बसवंत टोल नाका येथे त्यांचे वाहन वारंवार ओळखपत्र दाखवूनही सोडले जात नव्हते. महिला कर्मचाऱ्यांना त्यांनी ओळखपत्र दिले. त्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना तसेच अन्य ओळखपत्रही दाखवले. मात्र महिला कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. 

शेवटी त्यांनी "तुम्ही आमदार वाटतच नाही. त्यामुळे काहीही कारणे सांगू नका. गुपचुप टोल भरा'', असे चव्हाण यांना सुनावले. त्यावरुन चांगलाच वाद वाढला. चव्हाण यांनी नाक्यावरील पुस्तिकेत त्याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर टोल नाक्‍यावरील अधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात दिलगीरी व्यक्त केली. संबंधीतांवर कारवाईचे आश्‍वासन दिल्यावर वाद थांबला. मात्र, कार्यकर्ते तसेच नागरीकांसमोर अवमान झाल्याने आपण पिंपळगाव पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे चव्हाण यांनी 'सरकारनामा' प्रतिनिधीला सांगीतले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख