bagade criticize on congress and ncp | Sarkarnama

कॉंग्रेसच्या सत्तर वर्षांच्या राजवटीत गरीबी हटली का ? - हरिभाऊ बागडे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : सत्तर वर्ष देशावर सत्ता गाजवलेल्या कॉंग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, पण स्वातंत्र्य मिळून वर्षामागून वर्ष उलटली पण गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. पण केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आल्यानंतर पाच वर्षातच गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत दिलासा देण्याचे काम केले असा दावा हरिभाऊ बागडे यांनी केला 

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील निधोना गावात भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांनी सभा घेतली. यावेळी भाजप सरकारमधील पाच वर्षाचा काळ आणि कॉंग्रेसमधील सत्तर वर्षातील कामांची तुलना करतांना बागडे म्हणाले. केवळ गरिबी हटावचा नारा देणाऱ्या कॉंग्रेसने सत्तर वर्षात त्यासाठी प्रयत्न केले नाहीत. पण केंद्र आणि राज्यात सत्तेवर येताच भाजपने गरीब, शेतकरी मजूर यांच्यासाठी दोन रुपये किलो दरात गहू आणि तीन रुपये किलो दरात तांदुळ देण्याची योजना राबवली. अटल पेन्शन योजनेमार्फत वृद्ध नागरिकांना आधार दिला. केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकार हे गरिबांसाठी काम करत आहे. विरोधक बिनबुडाचे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला बळी पडू नका आणि भाजपला साथ द्या असे आवाहन देखील बागडे यांनी यावेळी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख