जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांनी बंद करावे - हरिभाऊ बागडे

जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांनी बंद करावे - हरिभाऊ बागडे

फुलंब्री : खोट नाटे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांनी सोडावे, कारण त्याचा फायदा त्यांना होणार नसून जनता सुज्ञ झालेली आहे. चांगलं किंवा वाईट जनतेला कळत त्यामुळे विकास कामांच्या जोरावर जनता मला निवडून देईल, असा विश्वास हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला. फुलंब्री विधानसभा मतदार संघातील जटवाडा येथे महायुतीचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांची प्रचार सभा पार पडली. बागडे म्हणाले, लोकांची दिशाभूल करणे विरोधकांनी बंद करावे, नसता मतदार त्यांना घरी बसवतील. कारण मला गाडी मध्ये नारळ घेऊन फिरायची सवय नाही व मी मतदारांशी खोटे देखील बोलत नाही. 

जे करतो ते कुठल्याही प्रसिद्धीसाठी किंवा नावासाठी करत नाही तर लोकांच्या कल्याणासाठी करत असतो. त्यात माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ ठेवत नाही. माझ्या मार्फत जटवाडा आणि परिसरात जलयुक्त शिवारची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. जटवाडा ते औरंगाबाद रस्ता मी पुढाकार घेतल्याने झाला. ज्याचा फायदा या परिसरातील दुग्धव्यवसाय करणारे व्यवसायीक, भाजीपाला पिकवणारे शेतकरी यांना होत आहे. सभागृह तर मी तालुक्‍यातील प्रत्येक गावाला दिलीच आहेत. आणि इतर देखील योजना केंद्र व राज्यसरकरच्या माध्यमातून देण्याचा पर्यंत केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या खोट्या गप्पांवर विश्वास न ठेवता स्वच्छ काम करणाऱ्या उमेदवाराला मत देऊन मला विजयी करून आणखी विकासकामे करण्याची संधी द्यावी, असे आवाहन बागडे यांनी यावेळी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com