महाआघाडीकडून भाजप आमदारांच्या विकासनिधीला कात्री लागू शकते - हरिभाऊ बागडे

आता राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे, नवीन येणारा मंत्री या कामांच्या बाबतीत काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मतदारसंघासाठी मिळणाऱ्या निधीला कात्री लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही अशी भिती बागडे यांनी व्यक्त केली.
 महाआघाडीकडून भाजप आमदारांच्या विकासनिधीला कात्री लागू शकते - हरिभाऊ बागडे

औरंगाबाद : राज्यातील सत्तांतरानंतर महाआघाडीकडून भाजप आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्‍यक असलेल्या निधीला कात्री लागू शकते अशी भिती विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केली. महिनाभराच्या सत्तापेचानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महायुतीच्या काळात भाजप आमदारांच्या मतदारसंघात भरघोस निधी विकासकामांसाठी मिळाला होता. महाआघाडीच्या सरकारकडून तो मिळणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

या संदर्भात सरकारनामाशी बोलतांना हरिभाऊ बागडे म्हणाले, राज्यात युतीचे सरकार होते तेव्हा माझ्या मतदारसंघात अनेक विकासकामे झाली, आतापर्यंत सर्वाधिक विकासनिधी याच काळात मिळाला. अनेक प्रकल्पांची कामे मतदारसंघात सध्या सुरू आहेत, त्यासाठी निधीची तरतूद आधीच झाल्यामुळे तो मिळेल यात शंका नाही. पण भविष्यात नवीन प्रकल्प किंवा कामे हाती घ्यावयाची असल्यास त्याला महाआघाडीच्या सरकारकडून निधी मिळेल की नाही? हे सांगणे कठीण आहे. 25-15 मधून बरीच कामे माझ्या व राज्यातील इतर आमदारांच्या मतदारसंघात गेल्या सरकारच्या काळात झाली आहे. संबंधित मंत्र्यांना या हेडखाली निधी देता येतो. 

परंतु आता राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे, नवीन येणारा मंत्री या कामांच्या बाबतीत काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मतदारसंघासाठी मिळणाऱ्या निधीला कात्री लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही अशी भिती बागडे यांनी व्यक्त केली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com