विधानसभा अध्यक्ष बागडे यांना पक्षांतूनच उमेदवारीसाठी आव्हान ?

  विधानसभा अध्यक्ष बागडे यांना पक्षांतूनच उमेदवारीसाठी आव्हान ?

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनातर्फे तयारी सुरु करण्यात आली आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठांकडून युती होईल असे सांगण्यात येत असले तरी अनेकांनी स्वतंत्र तयारी सुरु केली आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघातून भाजपतर्फे अनेकांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहेत. बागडें यांना वयामुळे उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा सुरु झाल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. पक्षाने सांगितल्यावर निवडणूक लढविणार असल्याची इच्छा व्यक्‍त करीत पुन्हा बागडेही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. 

गेल्या महिनाभरापासून फुलंब्री मतदारसंघ चर्चेचा विषय ठरत आहे. पाच वर्षांत बागडे यांनी मतदारसंघात चांगली कामे केली असून त्याच कामाच्या जोरावर पुन्हे ते निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र वयाचा विषय आल्यामुळे मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. यात बागडे यांचे समर्थक मानले जाणारे प्रदीप (आबा) पाटील यांनी निवडणुक लढविण्याची इच्छा अनेकांकडे बोलून दाखवली. एवढेच नाही तर त्यांनी भाजपसाठी कार्य करणाऱ्या अनेक व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर "मित्रानो फुलंब्री मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहे. आपली मदत व सहकार्य अपेक्षित आहे. आपला प्रदीप पाटील' असा संदेश आणि स्वत:चा फोटो पाटील यांनी सर्व सोशल मिडयावर शेअर करीत इच्छुक असल्याचे जाहिर केले आहे. 

त्यासह 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या अनुराधा चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केल्यापासून गावा-गावात जनसंपर्क वाढवत. विधानसभेची तयारी सुरु केली आहे. यासह उपमहापौर तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडेंनी मोर्चाच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चे बांधणी केल्याची माहिती समोर येत आहेत. यांच्यासह नामदेवराव गोडकर, शिवाजीराव पाथ्रीकर, सुहास शिरसाट व भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव राजेंद्र साबळे, यांचेही नाव समोर येत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत कोणाच्या गाळ्यात उमेदवारीची माळ पडेल, हे येणारा काळच सांगेल. सध्या मात्र, आपल्याला उमेदवारी मिळेल या अशेने प्रत्येकजण आप-आपल्यापरीने मतदारसंघात तयारीला लागला आहेत. निवडणुकीत दोन परस्पर विरोधी पक्षांमध्ये चुरस लागते. मात्र फुलंब्री मतदारसंघात सध्या आपल्याला तिकिट मिळेल यासाठी वरिष्ठांपर्यंत अनेकजण सेंटींग लावत आहेत. याच तयारीमुळे एकमेकांतील स्पर्धाही वाढीस लागली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com