घोटाळेबाज कॉग्रेसवाल्यांना मत देऊ नका - हरिभाऊ बागडे

घोटाळेबाज कॉग्रेसवाल्यांना मत देऊ नका - हरिभाऊ बागडे

फुलंब्री : आघाडी सरकारच्या काळात राज्यात सर्वाधिक घोटाळे झाले. जनतेला फक्त खोटी आश्वासने देऊन आपली घरे कॉंग्रेसच्या नेत्यांनी भरली. अशा घोटाळेबाज कॉंग्रेसवाल्यांना मत देऊ नका असे आवाहन भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार हरिभाऊ बागडे यांनी गोलटगांव येथील जाहीर सभेत केले. कॉंग्रेसकडे जनतेसमोर जाण्यासाठी मुद्देच नसल्याने राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असा विश्‍वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

पाच वर्षात केलेली विकासकामे सांगतानाच बागडे कॉंग्रेस-आघाडीच्या काळातील दुरावस्थेवर बोट ठेवून टीका करत आहेत. बागडे म्हणाले, समृध्दी मार्ग या भागातून जात आहे, यामुळे हा भाग समृध्द होईल. करमाड शिवारात औषधी भांडार उभे राहत आहे, पूर्ण राज्याला येथून औषधी पुरविली जाईल, याशिवाय ड्रायपोर्ट ही होणार आहे. इतका विकास आपल्या भागाचा झाला आहे. या मतदारसंघात 1470 कोटीची कामे पाच वर्षात केली. कुढल्याही जाती धर्माचा विचार न करता काम करीत राहिलो. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आपल्या भागात आणल्या. करमाड मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरऱ्यांना गाळे वाटप केले. एक रुपयाचा ही भ्रष्टाचार येथे झाला नाही. तरी विरोधक आरोप करीत आहेत, त्यांना भ्रष्टाचारच दिसतो असा टोला देखील बागडे यांनी यावेळी लगावला. 

पाणीप्रश्‍न निकाली काढला 
या भागातील पाणी प्रश्न कायमचा निकाली काढल्याचे सांगतानाच एमआयडीसी आहे तोपर्यत येथील गावाना पाणी मिळणार आहे. लोकहिताची अनेक कामे झाली आहेत, मतदारसंघाचा विकास झालायं आणि होतोय. कॉग्रेसच्या काळात सर्वत्र भकास होते. 25 वर्ष मराठा आरक्षण कॉग्रेसच्या काळात मिळाले नाही. पण या सरकारच्या काळात ते माझ्या सही ने मिळाले आणि टिकलेही असे बागडे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com