आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांची कीड; अधिकारी संवर्गासह १७ हजारांवर पदे रिक्त

वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, वर्ग एक अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गासह इतर ग्रेड सी व डी अशी तब्बल १७ हजार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशी महत्त्वाची तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत
Many Posts in State Health Department Vacant
Many Posts in State Health Department Vacant

बीड  : राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. धोरणात्मक पदांवर प्रभारीराज असल्याने व्यवस्थापन विस्कळित आहे. मात्र, सरकारची मानसिकता आणि सोयीच्या खुर्च्यांवर बसलेल्या अधिकाऱ्यांची आडकाठी यामुळे पदोन्नत्याच होत नाहीत. परिणामी, राज्याच्या आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांची कीड लागल्याचे चित्र आहे.

वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, वर्ग एक अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गासह इतर ग्रेड सी व डी अशी तब्बल १७ हजार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशी महत्त्वाची तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत.

वेळेत भरती न केल्याने वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत. वर्षांनुवर्षे पदोन्नत्या न केल्यामुळे पुढील संवर्गातील रिक्त पदांचा आजार अधिक दुर्धर होत आहे. आता कोरोना काळात तरी सरकार काही पावले उचलून यातून मार्ग काढेल, अशी अपेक्षा आहे. वास्तविक वैद्यकीय अधिकारी (वर्ग दोन) या उपलब्ध सव्वासहा हजार पदांमधून पुढच्या संवर्गातील अधिकारी मिळणार आहेत; पण त्यासाठी पदोन्नतीची प्रक्रिया गरजेची आहे. मात्र, पदोन्नत्या झाल्यानंतर मूळ पदाचा अधिकारी येऊन आपली सोयीची खुर्ची जाईल या भीतीमुळे या प्रभारींकडूच पदोन्नतीस आडकाठी होत आहे.
 

महत्त्वाच्या रिक्त पदांचा तपशील
पदनाम मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे.
अतिरिक्त संचालक ०३ ०१ ०२
सहसंचालक १० ०२ ०८
उपसंचालक २३ ०५ १८
जिल्हा आरोग्य अधिकारी २८१ १२४ १५७
शल्यचिकित्सक संवर्ग ६४३ २७५ ३६८
स्पेशालिस्ट केडर ६२७ १३ ४९३


काय आहेत रिक्त पदांची कारणे

-वेळेवर भरती नसल्याने एमओ मिळत नाही
-भरती, पदोन्नतीचे टप्पे वेळेवर होत नाहीत
-एमओ टू स्पेशालिस्टची प्रमोशन प्रक्रिया वेळेवर नाही
-सीएस केडरची प्रमोशन प्रक्रियाही कायम रखडलेली
-अनेक अधिकाऱ्यांचे चार्ज घेऊन सोयीच्या जागांवर ठाण
-पदोन्नतीच्या पदांवरील अनेक अधिकारी प्रभारी
-पदोन्नत्यांत सरकारची उदासीनता, सोयीची जागा जाईल म्हणून प्रभारींचीही आडकाठी

काय आहे पर्याय

-वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया वेळेवर करणे
-उपलब्ध एमओंची ज्येष्ठता यादी काढून स्पेशालिस्टचे प्रमोशन
-याच सिनिॲरिटीतून वर्ग एक अधिकारी पदाचे वेळेत प्रमोशन

प्रभारीराजमुळे काय आहेत अडचणी

-प्रभारींच्या सूचनांची फारशी दखल घेतली जात नाही
-पात्रता असूनही पदोन्नती मिळत नसल्याने मानसिकतेवर परिणाम
-प्रभारींमुळे खालील रिक्त पदेही भरली जात नाहीत
-प्रभारींमुळे यंत्रणा सक्षमपणे चालू शकत नाही

सहा वर्षांपासून पदोन्नत्या करण्याचे कार्यालयीन सांगितले जात आहे. लोक उपलब्ध नाहीत हे चुकीचे आहे. वर्षांनुवर्षे पदोन्नत्या न केल्यामुळे पदे रिक्त आहेत. परिणामी, वैद्यकीय अधिकाऱ्यांत असंतोष आहे. कोविडमध्ये कालबद्ध कार्यक्रम आखून शासनाने पदभरती, पदोन्नत्या कराव्यात. - डॉ. आर. बी. पवार, प्रदेशाध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com