'सरकारनामा'चे वृत्त खरे ठरले: पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डाॅ. राजेश देशमुख यांची नियुक्ती. - DR. Rajendra Deshmukh Appointed District Collector of Pune | Politics Marathi News - Sarkarnama

'सरकारनामा'चे वृत्त खरे ठरले: पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डाॅ. राजेश देशमुख यांची नियुक्ती.

चेतन देशमुख
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

पुण्याचे जिल्हाधिकारीपद पश्‍चिम महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते. या पदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि स्पर्धा असते. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण? याबाबत चर्चा सुरु होती. या पदावर आता डाॅ. राजेश देशमुख यांची नियुक्ती झाली आहे

पुणे :  हाफकीन जीव औषध महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्याजागी डाॅ. कुणाल खेमनार यांना नेमण्यात आले आहे. डाॅ. देशमुख यांना पदाचा कार्यभार त्वरीत हाती घेण्यास सांगण्यात आले आहे. 'सरकारनामा'ने देशमुख यांच्या नियुक्तीची शक्यता वर्तवली होती. ती खरी ठरली आहे. सध्या या पदाचा कार्यभार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे होता. 

पुण्याचे जिल्हाधिकारीपद पश्‍चिम महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते. या पदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि स्पर्धा असते. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण? याबाबत चर्चा सुरु होती.  लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुंबई 'म्हाडा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अस्तिककुमार पांडे, एस. पी. सिंग 'पीएमआरडी'चे आयुक्त सुहास दिवसे व पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल या नावांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी चर्चा होती.

आधीचे वृत्त ः पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी अनेक नावांवर खल- डाॅ. राजेश देशमुख यांची नेमणूक होणे शक्य

सातारा सीईओ तसेच यवतमाळ येथे जिल्हाधिकारी असताना लोकाभिमुख कामगिरीमुळे डॉ. राजेश देशमुख यांचेवर पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा झाल्याने तब्बल २२ शेतकरी,शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. फवारणीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना होती. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी डाॅ. देशमुख यांनी प्रभावी जनजागृती तसेच मोहीम राबवली होती. त्याचा परिणाम दिसून आला. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात एकही मृत्यू विषबाधाने झाला नाही. आता पुण्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याची मोठी जबाबदारी देशमुख यांना पेलावी लागणार आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख