आजचा वाढदिवस : बदामराव पंडित (माजी राज्यमंत्री) - badamra pandit | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : बदामराव पंडित (माजी राज्यमंत्री)

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 मे 2018

सध्या शिवसेनेत कार्यरत असलेल्या बदामराव पंडित यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य पदापासून सुरु झाली. श्री. पंडित यांनी तीन वेळा गेवराई विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भाजप शिवसेनेच्या पहिल्या सरकारच्या काळात दीड वर्षांसाठी त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेवराई तालुका सहकारी दुध संस्थेचे अध्यक्ष असलेल्या बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. जिल्हा परिषद /पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने मतदार संघात चांगली कामगिरी केली. जिल्ह्यात पक्षाचे केवळ चार जिल्हा परिषद सदस्य असून चौघेही त्यांचे समर्थक आहेत.

सध्या शिवसेनेत कार्यरत असलेल्या बदामराव पंडित यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य पदापासून सुरु झाली. श्री. पंडित यांनी तीन वेळा गेवराई विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भाजप शिवसेनेच्या पहिल्या सरकारच्या काळात दीड वर्षांसाठी त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेवराई तालुका सहकारी दुध संस्थेचे अध्यक्ष असलेल्या बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. जिल्हा परिषद /पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने मतदार संघात चांगली कामगिरी केली. जिल्ह्यात पक्षाचे केवळ चार जिल्हा परिषद सदस्य असून चौघेही त्यांचे समर्थक आहेत. त्यांचे पुत्र युद्धाजित पंडित जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आहेत. सामान्यांमध्ये मिसळणारे नेते अशी बदामराव पंडित यांची ओळख आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख