शिवसेना का घाबरेल ? शिवसेनेत सगळे वाघाचे बछडे : बच्चू कडू

..
bachhu Kadu
bachhu Kadu

मुंबई  : शिवसेना का घाबरेल ?  शिवसेनेत तर सगळे वाघाचे बछडे आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली. 


आज मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला बच्चू कडू हे देखील उपस्थित राहिले आहेत. दरम्यान यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आपण मातोश्रीवर आल्याचे सांगितले. 

दरम्यान त्यांना सध्या शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर विचारले असता त्यांनी युतीचा पेच सोडण्याइतका आमचा आकडा मोठा नाही असे सांगितले.तसेच राजकारणात फोडाफोडी होतच असते त्यामुळे शिवसेनेला घाबरायची गरज नसल्याचे ते म्हणालेत.

आधी शेतकरी वाचवा

दरम्यान यावेळी त्यांनी सरकार बनेल तेव्हा बनेल पाहिला शेतकरी वाचला पाहिजे असे सांगत सरकार स्थापन करा पण आधी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे असे सांगत जर शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर राज्यपालांकडे मोर्चा काढू असा इशारा देखील बच्चू कडू यांनी यावेळी दिला.

पोलीस बंदोबस्त वाढवला 

मातोश्रीवर आमदार यायला सुरुवात झाली असून, सध्या मातोश्रीबाहेर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. तसेच या बैठकीत आमदारांना मोबाईल आत नेण्यास मनाई करण्यात आली असून,  बैठकीतील कोणतीही चर्चा बाहेर जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतली खबरदारी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com