जास्तीत जास्त काय होईल मंत्रीपद जाईल : बच्चू कडू

माझ्या त्रासासाठी मी मंत्री झालेलो नाही, लोकांच्या त्रासासाठी मंत्री झालो आहे.
bachhu kadu on minister post
bachhu kadu on minister post

सातारा : कायदेशीर कारवाईसाठी मला अडविणारा आजपर्यंत तरी कोणी तयार झालेला नाही. माझ्यावर दबाव आणून मी कोणाचे ऐकणारा नाही. जास्तीत जास्त काय होईल मंत्रीपद जाईल पण, लोकांना न्याय देताना मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास मी ते खपवून घेणार नाही, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

मंत्री बच्चू कडू सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले, अनेक शासकिय योजना आजही लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. 50 वर्षापूर्वी महिला व बालसंगोपन योजना अस्तित्वात आली. मात्र, 10 ते 20 हजार विधवा महिला असताना लाभार्थ्यांची संख्या मात्र, तीनशे, चारशे असणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आम्ही सातारा जिल्ह्यात नवीन योजना लागू केली आहे.  

आपण आजच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत का, या प्रश्‍नावर कडू म्हणाले, फाईल विनाकारण थांबली तर त्यांची नोकरी थांबली. कायद्यानुसार कारवाईला सामोरे जावे लागले. शिक्षणाधिकाऱ्यांकडे घोषवारा मागितला आहे. सात दिवसांच्यावर फाईल थांबविली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.

प्रत्येक अधिकारी हा कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांशी जोडलेला असतो. मंत्री मंडळात असताना तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्‍यता आहे, यावर ते म्हणाले, माझ्या त्रासासाठी मी मंत्री झालेलो नाही, लोकांच्या त्रासासाठी मंत्री झालो आहे, असे स्पष्ट करून कायदेशीर कारवाईसाठी मला अडविणारा आजपर्यंत तरी कोणी तयार झालेला नाही. माझ्यावर दबाव आणून मी कोणाचे ऐकणारा नाही. जास्तीत जास्त काय होईल मंत्रीपद जाईल. पण, लोकांना न्याय देताना मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास मी ते खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com