राज्यमंत्री बच्चू कडूंनी मांडली व्यथा... 

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेवाटपावरून निर्माण झालेली नाराजी आता दूर झाल्याचं दिसत असलं तरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना कॅबिनेट मंत्री विश्वासात घेत नसल्याची, सातत्यानं डावलत असल्याची तक्रार दहापैकी सहा राज्यमंत्र्यांनी केल्याचं सूत्रांकडून समजतंय. या नाराज राज्यमंत्र्यांची व्यथा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
bacchu kadu talks about rights of state ministers
bacchu kadu talks about rights of state ministers

अमरावती - राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेवाटपावरून निर्माण झालेली नाराजी आता दूर झाल्याचं दिसत असलं तरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना कॅबिनेट मंत्री विश्वासात घेत नसल्याची, सातत्यानं डावलत असल्याची तक्रार दहापैकी सहा राज्यमंत्र्यांनी केल्याचं सूत्रांकडून समजतंय. या नाराज राज्यमंत्र्यांची व्यथा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

वास्तविक, कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्री हा वाद तसा नवा नाही. राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा अनेक सरकारांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. यावेळी, अब्दुल सत्तार, अदिती तटकरे, दत्ता भरणे, बच्चू कडू, शंभूराजे देसाई आणि सतेज पाटील या सहा राज्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपापल्या कॅबिनेट मंत्र्यांविरुद्ध तक्रार केल्याचं कळतं. 

कॅबिनेट मंत्री विश्वासात घेत नाही, आम्हाला सातत्याने डावललं जातं, ढावा बैठकांमध्ये काय होतं हे सांगितलंच जात नाही, आमच्याशी संबंधित खात्यांचे निर्णय आम्हाला माध्यमांमधून कळतात असं त्यांचं म्हणणं आहे. किमान आमच्याकडे असलेल्या खात्यांच्या निर्णयांबद्दलची माहिती तरी आम्हाला असावी अशी मागणी या मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती आहे. 

या तक्रारीची दखल घेऊन, अजित पवार यांनी कॅबिनेट मंत्र्यांना समज दिली होती, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. उलट, राज्यमंत्र्यांचं दुःख वेगळ्या कारणासाठी असल्याची खोचक आणि सूचक चर्चा कॅबिनेट मंत्र्यांच्या वर्तुळात ऐकू येते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com