बच्चू कडू समर्थकांचा कर्जमाफीसाठी उपोषणातून सरकारला घरचा आहेर!

जप्ती व सक्तीची वसुली थांबवा, कबूल केल्याप्रमाणे सात-बारा कोरा करा तसेच बॅंक, पतसंस्था व फायनान्स कर्ज माफ करून संपूर्ण कर्जातून शेतकऱ्यांना वाचवा, या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी सिन्नर येथे उपोषण सुरू केले आहे.
Bacchu Kadu Supporters Hunger Strike for Loan Waiver
Bacchu Kadu Supporters Hunger Strike for Loan Waiver

नाशिक : जप्ती व सक्तीची वसुली थांबवा, कबूल केल्याप्रमाणे सात-बारा कोरा करा तसेच बॅंक, पतसंस्था व फायनान्स कर्ज माफ करून संपूर्ण कर्जातून शेतकऱ्यांना वाचवा, या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी सिन्नर येथे उपोषण सुरू केले आहे. हे सर्वच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आग्रहातून मंत्री झालेले बच्चू कडूंचे समर्थक आहेत. 

सिन्नर तहसीलदार कार्यालयासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्याचे कबूल केले. ''त्यांनी शब्दाला जागून शेतकऱ्यांना न्याय देणं अपेक्षित असताना बॅंक, पतसंस्था, फायनान्सवाल्यांनी शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. पीककर्जापेक्षा शेतकऱ्यांना बॅंक, फायनान्स, पतसंस्था कर्जाचा खरा फास लागलाय. पण सरकार हे कर्ज माफ करण्याऐवजी फक्त दोन लाखांचे पीककर्ज माफ करून दिशाभूल करत आहे. हे फक्त व्याजच माफ झालंय. दोन लाखांवरील बॅंक, फायनान्स, पतसंस्था कर्जाचा विचार सुरू आहे, असे म्हणतात. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून बॅंका जाचक वसुली, जप्ती करतात. ही दुटप्पी भूमिका थांबवून वसुली त्वरित थांबली पाहिजे; अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. पूर्वीच्या कोरड्या व आताच्या ओल्या दुष्काळाने शेतकरी पीकपाणी नसल्याने मेटाकुटीला आला आहे. शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता न्याय द्यावा,'' अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

उपोषणात अर्जुन घोरपडे, किशोर नवघरे, पुंजाराम मरकड, अण्णासाहेब खाडे, अशोक थोरात, बबन कोकाटे, भाऊसाहेब जगताप, विठोबा गिते, आनंदा जाधव, त्र्यंबक भालेराव, वाल्मीक आव्हाड, सोपान आव्हाड, भिकन राव, विकास गोळेसर, संदीप लोंढे, गणेश गोळेसर, बाबूराव शिंदे, करण निकम आदी शेतकरी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com