bacchu kadu statement on avani tiger | Sarkarnama

वाघिणीला मारण्यासाठी इतक्‍या बळींची तरी का वाट पाहिली - बच्चू कडू

सुरेंद्र रामटेके
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

वर्धा : ज्या अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून काही जण ओरड करत आहेत, जर या वाघिणीने मुंबई किंवा दिल्लीत बळी घेतले असते तर सरकारने काय केले असते असा खडा सवाल आमदार बच्चू कडू यांनी विचारला आहे. या वाघिणीने तेरा बळी घेतले, संसदेच्या एखाद्या भागात ही वाघिण फिरली असती तर पंधरा बळी जाण्याची वाट बघावी लागली नसती, 15 बळी जाईपर्यंत सरकारने वाट का बघितली असा सवालही त्यांनी विचारला. साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्याची चर्चा होत नाही. तो कोंबडी, बकरीच्या रांगेत आहे, आमदार, खासदार किंवा एखादा अधिकारी मेला तर तो वाघाच्या रांगेत जाऊन बसतो, ही विषमता असल्याचे ते म्हणाले 

अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर केंद्रातील दोन मंत्र्यांमध्येच सध्या वाद सुरू आहे या प्रश्नकडे लक्ष वेधले असता कडू म्हणाले की दिल्ली किंवा मुंबई सारख्या ठिकाणी या वाघिणीने बळी घेतले असते तर सरकारने काय केले असते. आज वर्ध्यात त्यांनी सेवाग्राम रुग्णालयाची पाहणी केली. त्यांच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रहार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या दृष्टीने प्रहार पक्षाची उमेदवारासाठी चाचपणी सुरू असल्याचेही कडू यांनी सांगितले. 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे या निवडणुकीची तुमची तायरी सुरू आहे का ? असे विचारले असते ते म्हणाले, रावसाहेब दानवेंकरिता तयारीची गरज नाही, ते बिना तयारीची शिकार आहे. शेतकरी आणि अन्य प्रश्‍नांसंबधी बोलताना कडू म्हणाले पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अधिवेशन संपेपर्यंत तूर, चण्याचे पैसे न मिळाल्यास प्रत्येक महिन्याला एक कार्यालय जाळू. सचिवच मंत्र्यांना आदेश द्यायला लागले अशी राज्यात अवस्था असल्याची टीकाही त्यांनी केली. 

जे काही चांगलं केलं ते भाजपनं केलं अस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेच्या गळी उतरवण्याच काम भाजप करीत आहे. भाजप निव्वळ कामाचा आव आणत आहे अशी घणाघाती टीका करून कडू म्हणाले, भाजपची भाषाच अहंपणाची आहे. सध्या मंत्रालयात अधिकारीच मंत्र्यांना आदेश देत असल्याचे चित्र आहे. सचिवच मंत्र्यांना सूचना देत आहेत अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली. पीकविमा म्हणजे सरकार आणि कॉपोरेट कंपन्यांचे लॉबिंग आहे. तूर आणि चण्याचे पैसे शेतकऱ्यांना अजूनपर्यत सरकारने दिलेले नाहीत व्याजासह सरकारने ही रक्कम पैसे दयावी अन्यथा मार्केटिंग कार्यालयाला टाळे ठोकू असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख