बच्चू कडूंनी केले ते संजय राठोडांना का नाही सुचले?

कळंब तालुक्यात झालेल्या अपघातातल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी पत्र लिहिले. बच्चू कडूंनी जे केले ते यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना का नाही सुचले, असा प्रश्‍न विचारला जात आहे
Bacchu Kadu Demands Financial Help for Accident Victims
Bacchu Kadu Demands Financial Help for Accident Victims

नागपूर : कळंब तालुक्यात झालेल्या अपघातातल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी पत्र लिहिले. बच्चू कडूंनी जे केले ते यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना का नाही सुचले, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्‍यातील जोडमोहा येथील बाबाराव वानखडे यांची राखड शिरवून परत येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गेल्या शनिवारी सायंकाळी अपघात झाला होता. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी एम. देरवेंद्र सिंह यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील एकही नेत्याने पुढाकार घेतला नाही. उलट नेते फीत कापण्यात व मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीची तयारी करण्यात व्यग्र आहेत. नातेवाईकांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी पाठविलेल्या पत्रातून केली. 

अपघातातील वानखडे कुटुंबीय हे गरीब आहे. हातावर आणून पानावर खाणारे आहे. एकाच कुटुंबातील नऊ लोकांचा मृत्यू झाला असून सहा लोकांवर यवतमाळ व नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या घटनेकडे संवेदनशीलपणे बघितले आणि अपघातातील नातेवाईकांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर कुटुंब हे अत्यंत गरीब असून हातमजुरी करून जगणारे आहे. त्यांच्यावर फार मोठा दुःखद प्रसंग ओढवला आहे. त्या कुटुंबाना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रतिव्यक्ती पाच लाख मदत मिळाल्यास त्यांना दुःखातून सावरण्यासाठी थोडीफार मदत होईल, असे मतही राज्यमंत्री कडू यांनी पत्रात व्यक्त केले आहे. सदर घटनेबाबत सहानुभूतीने विचार करावा, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com