माझे घर स्मशानभूमीजवळ असले तरी मला फरक पडत नाही - बच्चू कडू

माझे घर स्मशानभूमीजवळ असले तरी मला फरक पडत नाही - बच्चू कडू

अमरावती : माझं निवासस्थान हे स्मशान भूमीजवळ दिले आहे. तिथे सहसा कुणी जात नसत ते आम्हाला दिले. जागेचा काही प्रश्न नाही काम करायची आमच्यात धमक आहे. त्यामुळे निवासस्थान स्मशान भूमीजवळ आहे, समुद्राजवळ आहे की हेमामालिनीच्या घराजवळ आहे याच्याशी आमचा संबंध नसून काम करणे हा आमचा विषय आहे असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. 

दरम्यान काही अधिकाऱ्यांची बदमाशी नक्कीच आहे. मुद्दाम आम्हाला विधान परिषदेत दालन दिले, तिथं कार्यालयाची जागा दिली, मंत्रालयातही दालन दिले नाही. आमच्या कडे अपंग बांधव येत असतात त्यासाठी पहिल्या माळ्यावर दालन देणे गरजेचे होते पण दिले नाही. पण जे आहे त्यात समाधान आहे, विचित्र स्थितीतही चांगले कार्य करू जर मला दिलेला बंगाल आणखी कुणाला द्यायचा असेल तर त्यांना देऊन टाका, स्मशानभूमीमध्ये मला निवासस्थान बांधून दिले तरी तिथे राहू असे बच्चू कडू म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com