महाविकास आघाडीत बच्चू कडूना मंत्रीपदाची लॉटरी ?

 महाविकास आघाडीत बच्चू कडूना मंत्रीपदाची लॉटरी ?

मुंबई : राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरकार येणार हे आता निश्‍चित झाले आहे. राज्यात आपल्या वेगळ्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या आमदार बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते.विधानसभा निवडणुकीनंतर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोनही आमदारांनी शिवसेनेला सर्वप्रथम आपला पाठिंबा दिला. शिवाय बच्चू कडू यांचं विदर्भात चांगलं काम असल्याने याचा फायदा विदर्भात काहीशी कमजोर असणाऱ्या शिवसेनेला होऊ शकतो. त्याचबरोबर बच्चू कडू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याने मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. 

शिवसेनेच्या या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान? 
नव्या सरकारमध्ये 15 मंत्रिपदं शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतात. यात कॅबिनेट मंत्रिपदं अधिक निर्माण करून राज्यमंत्रीपदं कमी करण्याची रणनीती शिवसेना आखू शकते. शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये दिवाकर रावते,सुभाष देसाई,प्रताप सरनाईक,गुलाबराव पाटील,शंभुराजे देसाई,सुनील प्रभू,दीपक केसरकर,उदय सामंत,भास्कर जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. 

आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात नाही 
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच नाव पुढे करण्यात आलं असलं तरी सध्या त्यांना मुख्यमंत्री करण्याची शक्‍यता कमी आहे. शिवसेना-भाजपमधील बिघडलेले संबंध,महाविकास आघाडीच शिवधनुष्य, अनुभवाची कमी यामुळे आदित्य ठाकरे यांचा सध्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्‍यता कमी आहे. अडीच वर्षानंतर आदित्य यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. 

कदमांसह काहींना मिळू शकतो डच्चू 
शिवसेनेतून काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्‍यता आहे. यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम याचा समावेश असू शकतो. त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेतून त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलं. यामुळे एकाच घरातील दोघे सरकारमध्ये असल्याने मंत्रिमंडळात रामदास कदम यांचा समावेश होण्याची शक्‍यता कमी आहे. याशिवाय रवींद्र वायकर,दादा भुसे,संजय राठोड,तानाजी सावंत,सदा सरवणकर यांना देखील डच्चू मिळू शकतो. 

विधानपरिषदेतील 4 जणांना मंत्रिमंडळात स्थान ? 
ज्येष्ठ नेते सुभाष देसाई,दिवाकर रावते यांच्यासह दोन नवे चेहरे विधानपरिषदेतील असू शकतात.महिला आणि सुशिक्षित चेहरा म्हणून आमदार मनीषा कायंदे यांच्या नावाची चर्चा आहे तर मातोश्रीच्या विश्वासातले म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com