नारायणगावचे बाबु पाटे-संतोष खैरे खासदार आढळरावांच्या स्वागताला आणि पाठींब्यालाही!

शिरुर लोकसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हेंना पाठींबा देण्याच्या रविवारच्या नारायणगाव येथील बैठकीत उपस्थित राहून कोल्हेंच्या उमेदवारीला 'केवळ शुभेच्छा' दिलेले कट्टर शिवसैनिक व नारायणगावचे सरपंच बाबु पाटे व शिवसेना तालुका उपप्रमुख संतोषनाना खैरे यांनी आज सोमवारी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे गावात स्वागत करीत शिवसेनेचा नारा दिला.
नारायणगावचे बाबु पाटे-संतोष खैरे खासदार आढळरावांच्या स्वागताला आणि पाठींब्यालाही!

शिक्रापूर : शिरुर लोकसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हेंना पाठींबा देण्याच्या रविवारच्या नारायणगाव येथील बैठकीत उपस्थित राहून कोल्हेंच्या उमेदवारीला 'केवळ शुभेच्छा' दिलेले कट्टर शिवसैनिक व नारायणगावचे सरपंच बाबु पाटे व शिवसेना तालुका उपप्रमुख संतोषनाना खैरे यांनी आज सोमवारी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे गावात स्वागत करीत शिवसेनेचा नारा दिला. विशेष म्हणजे या दोघांबरोबर आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनीही नारायणगावात आपला प्रचार झंझावात सुरू केल्याने जुन्नरचे राजकारण पुन्हा एकदा रंजक झाले.  

शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या समर्थनार्थ त्यांचे गाव असलेल्या वारुळवाडी व नारायणगाव येथील त्यांच्या नातेसंबंधातील काही कार्यकर्त्यांनी व राष्ट्रवादीच्या काही स्थानिकांनी पुढाकार घेत कोल्हेंच्या समर्थनार्थ घेतलेली कालची (दि.०७) गावबैठक चांगलीच गाजली. या बैठकीत शिवसेनेचे कट्टर असे नारायणगावचे सरपंच बाबु उर्फ योगेश पाटे तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा शिवसेनेचे जुन्नर तालुका उपप्रमुख संतोषनाना खैरे दोघेही उपस्थित झाल्याने तालुक्यात अनेक उलटसुलट चर्चा झाल्या.

याच सर्व चर्चांना लगेच आज (सोमवारी) पूर्णविराम देण्यासाठी १७ पैकी १५ सदस्य शिवसेनेचे निवडून आणून नारायणगाव ग्रामपंचायतीवर एकहाती शिवसेनेचा भगवा फडकावलेले सरपंच बाबु पाटे यांनी आज सकाळी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे गावात दणकेबाज स्वागत केले. आम्ही कट्टर शिवसैनिक असून या मतदार संघातील खासदार हा शिवसेनेचाच होईल आणि ते खासदार शिवाजीराव आढळरावच असतील अशी प्रतिक्रिया यावेळी पाटे आणि खैरे यांनी व्यक्त केल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिली.

दरम्यान जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे शिवसेनेत आल्याने शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या जेष्ठ सदस्या आशाताई बुचके या नाराज असल्याची चर्चा होती. यालाही आजच्या घटनेने फाटा दिला गेला असून सोनवणे व बुचके दोघांनीही आच पासून जुन्नर प्रचार दौ-यात सहभागी होत आपला आगामी लोकसभा निवडणूकीत एकत्र राहून खासदार आढळराव यांना चौकार मारण्यासाठी मदतीचा इरादा स्पष्ट केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com