शरद पवारांच्या सभेमुळे बाबासाहेब पाटलांना मिळाले बळ

babasaheb-Patil-Sharad-Pawar
babasaheb-Patil-Sharad-Pawar

अहमदपूर :  एकीकडे बंडखोरीने ग्रासलेली भाजप आणि दुसरकीडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची झालेली प्रचंड जाहीर सभा यामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे बाबासाहेब पाटील यांना बळ मिळाल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.

अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. यात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार दिलिपराव देशमुख, मुळ भाजप पण आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अयोध्या केंद्रे यांचा समावेश आहे.

भाजपमधून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी एकुण आठजण उत्सुक होते. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती आणि अपेक्षेप्रमाणे घडलेही तसेच.

भाजप मधील बंडखोरी आणि बेदिली आघाडीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. याशिवाय शरद पवार यांची मतदारसंघात झालेली सभा बाबासाहेब पाटील यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

पवार यांनी सभेत युती शासनाचे वाभाडे तर काढलेच, पण बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघातील कामाची आणि त्यांच्या दूरदृष्टीचे जाहीर कौतुकही केले. एकुणच या सभेचा सकारात्मक परिणाम होईल आणि बाबासाहेब पाटील यांना बळ मिळेल असे दिसते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com