मंजूरी नसलेल्या योजनेचे उद्घाटन करणाऱ्या आमदारांना मत देणार का? 

मंजूरी नसलेल्या योजनेचे उद्घाटन करणाऱ्या आमदारांना मत देणार का? 

अहमदपूर (लातूर): मंजूर नसलेल्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या आमदारांना मत देणार का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी केला.

बाबासाहेब पाटील यांनी थोडगा, थोडगा वाडी, तिर्थ, धानोरा, मोघा, किनीकद्दू, थोट सावरगाव, जांब, उन्नी, हासर्णी, टेंभूर्णी, माळेगाव, कोकणगा, मांडणी, हाडोळती या गावातील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी पाटील यांनी विद्यमान आमदारांवर तोफ डागली, ते म्हणाले, हडोळती येथे कुठल्याही प्रकारची पाणीपुरवठा योजना अद्याप मंजूर झालेली नाही. मात्र विद्यमान आमदारांनी या पाणीपुरवठा योजनेचे नारळ वाढवून उद्घाटनही करून टाकले. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यासारखा आहे. नाफेडने खरेदी केलेल्या तूर खरेदीत देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, परंतु हा भ्रष्टाचार करणाऱ्यांना देखील पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. दरम्यान, चाकूर तालुका ग्राम रोजगार संघटनेच्या वतीने बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com