babanrav pachpute | Sarkarnama

आमदार पूर्ण तालुक्‍याचा असतो - बबनराव पाचपुते

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

नगर :"कुकडी'प्रश्‍नी आमदार राहुल जगताप यांनी आंदोलन करून जादा पाणी मिळवून घेतले. साहजिकच श्रीगोंदे तालुक्‍यात त्यांच्या नावाचा उदोउदो झाला. श्रीगोंदे तालुक्‍यातीलच इतर नेत्यांनी मात्र जगताप यांच्यावर टीकास्त्र सोडले.

नगर :"कुकडी'प्रश्‍नी आमदार राहुल जगताप यांनी आंदोलन करून जादा पाणी मिळवून घेतले. साहजिकच श्रीगोंदे तालुक्‍यात त्यांच्या नावाचा उदोउदो झाला. श्रीगोंदे तालुक्‍यातीलच इतर नेत्यांनी मात्र जगताप यांच्यावर टीकास्त्र सोडले.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी तर थेट ""आमदार तालुक्‍याचा असतो, एका गावचा नाही. आंदोलनाचा बागुलबुवा करणाऱ्यांनी नेमका कायम साध्य केले,'' अशी टीका केली. 
पालकमंत्र्यांची पाठराखण 
"कुकडी'च्या पाण्याबाबत आपण पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी अगोदरच मुख्यमंत्र्यांना भेटलो. शेतकऱ्यांना घेऊन गेलो, त्याच्या आदल्याच दिवशी सरकारने, "शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही' असा अध्यादेश काढल्याने शेतकऱ्यांसह त्यांना भेटता आले नाही. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पाण्याबाबत सकारात्मक निर्णय करून दिला. कोणी काहीही म्हणत असले, तरी पालकमंत्री पाण्याबाबत योग्य ट्रॅकवर आहेत. ते कमी बोलून शेतकऱ्यांना जास्त पाणी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे म्हणत बबनराव पाचपुते पालकमंत्र्यांची पाठराखण करीत आहेत. 
त्यांचे वांगे भाजले पाहिजे 
"दुसऱ्याचे घर जळाले तरी चालेल; पण "त्यां'चे वांगे भाजले पाहिजे," अशी नीती वापरली जात आहे,'' अशी टीका करून पाचपुते म्हणाले, ""कालवा सल्लागार समितीची बैठक दीड तास चालली. त्यात आपण निम्मा वेळ बोललो. आमदार राहुल जगताप, कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे दोन-दोन वाक्‍येच बोलले. आता इकडे मात्र पाण्यासाठी आंदोलनाचा स्टंट करून त्यांनी सगळेच मिळविल्याचे भासवीत आहेत.'' 
आता राजकारण नको 
पाण्यासाठी राजकारण करू नका. शेतकरी जगला पाहिजे. मागील तीन-चार वर्षे फळबागा जळाल्या होत्या. या वर्षी कुठे उत्पन्नाची आशा धरली. आता नेत्यांनी राजकारण करू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी राजकारण करू नये. नेत्यांनी किमान शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र यावी, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते बोलून दाखवीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख