babanrao pachpute about fadavnis govt | Sarkarnama

फडणवीस सरकार योग्य ट्रॅकवर : पाचपुते 

संजय आ काटे 
गुरुवार, 26 जुलै 2018

श्रीगोंदे (जि. नगर) : मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकार योग्य पद्धतीने पावले उचलत आहे. न्यायालयीन प्रक्रियेत जास्त लक्ष द्यावे लागल्याने मराठा नेत्यांशी सरकारने डायलॉग कमी ठेवल्याचे वाटते. मात्र सरकार मराठा आरक्षण देण्याबाबत प्रयत्नशील असल्याने त्याबाबत लवकर तोडगा निघेल, असा विश्‍वास माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी व्यक्‍त केला. 

पाचपुते म्हणाले, काही वर्षांपूर्वीची व आजची मराठा समाजाची स्थिती वेगळी आहे. त्यावेळी जमिनी सिलिंगमध्ये गेलेल्या लोकांना आज मुलांना नोकरी लावणेही अवघड झाले असल्याने आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातच सरकारने मेगा नोकरभरतीची घोषणा केल्यावर मराठा समाजातील मुलांना आरक्षण नसल्याने आता नोकरी मिळणार नाही असे वाटल्याने तरुण रस्त्यावर उतरला. कोपर्डी घटनेनंतर मोर्चे शांततेत काढणाऱ्या मराठ्यांनी आता हिंसक मार्ग पत्करला असला तरी त्यात कुठले राजकारण नाही. निवडणूक जवळ आल्याने यात राजकारण आणले जात आहे अथवा आपोआप येत असले, तरी हिंसा करण्यासाठी कुणीही पाठबळ देत असेल असे आपणाला वाटत नाही, असे पाचपुते म्हणाले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख