शेतकरी, नोकरदार, कामगारांना न्याय देणारा अर्थसंकल्प- बबनराव लोणीकर

 शेतकरी, नोकरदार, कामगारांना न्याय देणारा अर्थसंकल्प- बबनराव लोणीकर

औरंगाबाद : केंद्राने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि शेतकरी, नोकरदार, कामगार अशा सगळ्याच क्षेत्रातील लोकांना न्याय देणारा असल्याचे मत राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केले. गेल्या बत्तीस वर्षात नरेंद्र मोदी हे एकमेव असे पंतप्रधान आहेत ज्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे. कुणी या बजेटला निवडणुकीपूर्वीचे म्हणून टिका करत असेल तर ती योग्य ठरणार नाही. 

केवळ शेतकरीच नाही तर असंघटित कामगारांना 7 हजार रुपयांचा बोनस, 3 हजार रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय म्हणजे त्यांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल म्हणावे लागेल. नोकरदार वर्गाला पाच ते साडेसहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर करातून सुट हा देखील ऐतिहासिक निर्णयच म्हणावा लागेल. एकंदरित देशातील सर्वसामान्य वर्गाला या अर्थसंकल्पातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. 

सोडचार वर्षात महागाई आटोक्‍यात आणून देशाच्या करप्रणालीत वाढ करण्यासाठी केंद्राने उचललेली पावल आणि त्याचे सकारात्मक परिणाम यामुळे देशाचा विकासदर वाढला आहे. सरंक्षण खात्यासाठी कधी नव्हे ते तीन लाख कोटींची तरतूद करत मोदी सरकारने देशाच्या सुरक्षे संदर्भात कदापी तडजोड केली जाणार नाही हे दाखवून दिले आहे. 

मेक इन इंडिया, डिजीटल इंडियाची विरोधकांकडून टिंगल उडवली गेली, पण या क्षेत्रात देखील गेल्या साडेचार वर्षात देशाने खूप प्रगती केली आहे. त्यामुळे एक परिपुर्ण असे बजेट म्हणून याकडे पहायला हवे अशी अपेक्षाही लोणीकर यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com