मतदारसंघात भरघोस विकासकामे झाली, म्हणून मला मत द्या - बबनराव लोणीकर

 मतदारसंघात भरघोस विकासकामे झाली, म्हणून मला मत द्या - बबनराव लोणीकर

परतूर : परतुर-मंठा मतदारसंघात पाच वर्षात भरघोस विकासकामे झाली आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात असल्यामुळे मतदारसंघासाठी कधी निधी कमी पडू दिला नाही. रस्ते, पाणी, वीज या सगळ्या मुलभूत सुविधा निर्माण करण्यात आपल्याला यश मिळाले आहे, आणि म्हणून या विकासकामाच्या जोरावर मला मत द्या हे सांगण्यासाठी मी आलो आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतूर-मंठा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी मतदारांना आवाहन केले. 

मतदारसंघातील सेवली येथे लोणीकरांची प्रचार फेरी काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. त्यानंतर आयोजित सभेमध्ये लोणीकरांनी मतदारसंघ आणि सेवली व आसपासच्या भागासाठी केलेल्या विकासकामांची माहिती आपल्या भाषणातून दिली. लोणीकर म्हणाले, मागील पाच वर्षात मी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करीत असतांना नेर सेवली सर्कल मध्ये मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून परिसरातील प्रत्येक भागातील रस्त्यांची कामे झाली आहेत. 

वीज, पाणी व आरोग्याचे प्रश्‍न देखील गंभीर होते, त्यासाठी देखील निधी आणून या समस्या आपण सोडवण्यात यशस्वी ठरलो. पाण्याचा प्रश्‍न फक्त या गावाचा नाही, मतदारसंघाचा नाही, तर संपूर्ण मराठवाड्याचा सोडवून दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण मराठवाडा वॉटरग्रीडची योजना सुरू करत आहोत. भविष्यात मतदारसंघात आणखी बरीच विकासकामे करायची आहेत. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून मला निवडून द्या असे आवाहन देखील लोणीकरांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com