मराठवाड्यात सोमवारी कृत्रिम पाऊस पाडणार : बबनराव लोणीकर

Rain_artifcial
Rain_artifcial

औरंगाबाद : मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज पुन्हा नवीन 'डेडलाईन' दिली. 'सोमवारपासून कृत्रिम पावसाचा नव्याने प्रयोग मराठवाड्यात राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी अमेरिकन कंपनीचे विमान आज औरंगाबादमध्ये दाखल झाले असून सोमवारी अपेक्षित हवामानाचा प्रतिसाद मिळाल्यानंतर कृत्रिम पावसाला सुरुवात करणार' अशी माहिती मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिली. 

दोन दिवसापूर्वी बबनराव लोणीकर यांनी माध्यमांशी बोलताना १७ ऑगस्ट रोजी मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार असल्याचे सांगितले होते. त्यापूर्वी जुलैमध्ये माध्यमांशी बोलताना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल असेही सांगून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांच्या आशा वाढवल्या होत्या.

त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी औरंगाबादच्या विमानतळावर पाऊस पाडण्यासाठीचे विमान दाखल झाले असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'साम टीव्ही'ने याची खोलात माहिती घेतल्यानंतर तो कृत्रिम पावसाचा प्रयोग नव्हता तर ती केवळ 'ट्रायल' होती, हेही समोर आले.

ज्या विमानाने मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडायचा होता तेच विमान त्यावेळी आले नसल्याने पाऊस कधी पडणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विशेष म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये असलेले आयआयटीएमचे विमान ट्रायलसाठी आणण्यात आले होते.

मात्र आज बबनराव लोणीकर यांनी येत्या सोमवारी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला पुन्हा सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता खरंच पाऊस पडेल का असा प्रश्न नाही मराठवाड्यातील जनतेला पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com