babandada shinde | Sarkarnama

आजचा वाढदिवस : बबनदादा शिंदे, आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माढा, जि. सोलापूर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांची ओळख आहे. 1995 मध्ये अपक्ष आमदार म्हणून शिंदे यांना सर्वप्रथम विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर 1999 ते आजतागायत आमदार शिंदे राष्ट्रवादीकडून माढ्यातून विजयी होत आहेत. सहकारातील साखर कारखाना आदर्शवत चालविण्याचा उत्तम उदाहरण म्हणून आमदार शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. उजनी धरणातील पाणी सीना नदीत आणून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यात आमदार शिंदे यांची मोलाची भूमिका आहे. युतीच्या काळात मिळालेले आमदार शिंदे यांनी आशिया खंडातील सर्वांत मोठा 18 किलोमीटरचा भीमा-सीना जोडकालवा करून घेतला. माढ्याच्या राजकारणात आमदार शिंदे यांची एकहाती सत्ता आहे. महाराष्ट्र पंचायतराज समितीचे अध्यक्ष, डेक्कन शुगरचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख