बबन शिंदे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट केवळ सहायता निधीपुरती : कल्याण काळे 

बबन शिंदे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट केवळ सहायता निधीपुरती : कल्याण काळे 

पुणे : माढ्याचे आमदार बबन शिंदे व सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर या तालुक्‍यातील मुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक कल्याण काळे यांनीदेखील मुख्यमंत्री निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला

येत्या काही दिवसात पाच लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत. दरम्यान, शिंदे यांची भेट ही केवळ सहायता निधीपुरती होती. त्यात राजकीय विषय नसावा, असा दावा शिंदे यांनी केला. 

येत्या विधानसभेला काळे यांची माढ्यातून उमेदवारी निश्‍चित आहे. या पार्श्‍वभूमीवर शिंदे बंधूनी मुख्यमंत्री निधीला मदत करण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली. तीन आडवड्यांपूर्वी सोलापूरला राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यावेळी बबन शिंदे अनुपस्थित होते. त्यांनतर राष्ट्रवादीच्या पूरग्रस्त निधीला मदत न करता शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केल्याने त्याचे राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत. 

बबन शिंदे राष्ट्रवादी सोडणार याची चर्चा जिल्हाभर झाल्याने त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीची अर्धिक चर्चा झाली. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांचे राजकीय विरोधक कल्याण काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत राजकीय गणित नसावे, अशी भूमिका मांडली. मुख्यमंत्री निधीला कुणीही मदत करू शकते, असे त्यांनी सांगितले.

 माझ्या कारखान्याच्यावतीने मीदेखील पुढील काही दिवसात मुख्यमंत्र्याची वेळ घेऊन त्यांच्याकडे पाच लाख रूपयांचा पूरग्रस्त सहायता निधी सुपूर्द करणार आहे, असे काळे यांनी सांगितले. काळे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून निवडणूक लढविली होती. काळे यांनी शिंदे यांना चांगली लढत देत तब्बल 62 हजार मते मिळविली होती.

 काळे हे गेल्या काही वर्षात मुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक बनले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काळे यांनी भाजपात प्रवेश करीत लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचा प्रचार केला. निंबाळकर यांच्या विजयात काळे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शिंदे यांच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीने माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चा जोरात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com