आजचा वाढदिवस : बबन घोलप - माजी मंत्री, शिवसेना नेते  - baban gholap birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : बबन घोलप - माजी मंत्री, शिवसेना नेते 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

बबनराव घोलप हे राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री, नाशिकचे शिवसेना नेते. गेल्या
अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या घोलप यांचा वाढदिवस धुमधडाक्‍यात साजरा केला
जाणार आहे. सोशल मिडीयावर `50 वर्षे सदा सर्वदा, शिवसेनेसाठी ' या टॅगलाईन आहे.
आगामी 2019 हे निवडणुकीचे असल्याने त्याला राजकीय संदर्भ ओघाने आहेच. 

घोलप यांनी 1985 मध्ये शिवसेनेतर्फे मशाल या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढली.
त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 1990 मध्ये ते आमदार झाले. 1995 मध्ये
दुसऱ्यांदा विजयी झाल्यावर शिवसेना- भाजप युती सरकारमध्ये ते समाज कल्याण मंत्री
बनले. त्यानंतर या मतदारसंघातून ते सलग पाच वेळा आमदार बनले. देवळाली शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. चर्मकार समाजाच्या विविध जाती, घटकांना एकत्र आणून संघटन निर्माण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघ स्थापन केला. त्याचे ते अध्यक्ष आहेत. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पूत्र योगेश शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. बबनराव घोलप चित्रपटक्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी नीलांबरी या चित्रपटाची निर्मिती केली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख