...तरीही मॅन आॅफ द मॅच देवेंद्र फडणवीसच!

भाजपच्या नेत्यांकडून फडणवीस यांचे कौतुक
...तरीही मॅन आॅफ द मॅच देवेंद्र फडणवीसच!

पुणे : शिवसेनेने साथ न दिल्याने सत्ता गमवावी लागलेल्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. या साऱ्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस उठून दिसले. एवढेच नाहीतर तेच मॅन आॅफ द मॅच आहेत, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी कौतुक केले आहे. 

भाजपच्या संघटनेत संघटन सचिव हे मोठे पद असते. त्या पदावरील व्यक्तीने फडणवीस यांचे कौतुक केल्याने साहजिकच फडणवीस समर्थकांत समाधान आहे. फडणवीस यांनीही संतोष यांना धन्यवाद दिले आहेत.

महाराष्ट्रातील सध्याच्या घटनाक्रमात (सत्तास्थापनेच्या) फडणवीस हेच सामन्याचे मानकरी ठरले आहेत. शांत, धोरणी आणि सत्तेच्या मोहापासून दूर राहिलेले फडणवीस हे इतर खुज्यांपेक्षा अधिक उंच भासतात, असे संतोष यांनी ट्विट केेले आहे. 

दुसरीकडे शिवसेनेच्या `सामना` या मुखपत्रातून फडणवीस यांच्यावर दुगाण्या झाडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे हे दुर्देवी असल्याच्या त्यांच्या विधानाबद्दल `मगरीचे अश्रू` अशा शब्दांत टीका करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे राज्यातील गुंतवणूकीवर परिणाम होईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले होते. ``हे त्यांचे नक्राश्रू आहेत. सत्तास्थापनेसाठी चोवीस तासही वाढवून द्यायला राजभवनाने नकार दिला. राष्ट्रपती राजवटीची पटकथा आधीच लिहीली गेली होती. राज्यपाल हे संघाचे स्वयंसेवक आहेत. आपल्याचा माणसाच्या हातात कारभार राहणार असल्याने भाजपवाले खूष आहेत. राष्ट्रपती राजवटीचा निषेध फडवणीस यांनी केला असता तर त्यांची नियत साफ आहे, असे म्हणता आले असते.``असेही अग्रलेखात म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com