aziz premji donates fifty thousand crores for educational sector
aziz premji donates fifty thousand crores for educational sector

अझीम प्रेमजी यांची शालेय शिक्षणासाठी ५० हजार कोटींची मदत

या मदतीच्या माध्यमातून प्रेमजी हे जगातील सर्वात मोठे दाते ठरले आहेत.

पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी शालेय शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी तब्ल ५० हजार कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. गेल्या सात वर्षात प्रेमजी यांनी तब्बल १ लाख ४५ हजार कोटी रूपयांची मदत केली आहे.

या मदतीच्या माध्यमातून प्रेमजी हे जगातील सर्वात मोठे दाते ठरले आहेत. प्रेमजी यांनी विप्रो का्पोरेशन या कंपनीच्या शेअरपैकी ३४ टक्के शेअर देशातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी वापरणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केलेले आहे.

देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणे गरजेचे असल्याची भूमिका प्रेमजी वारंवार मांडत असतात. या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्यासाठी अझीम प्रेमजी फाउंडेशन स्थापना करण्यात आली असून या फाऊंडेशनच्या माध्यमातून देशातील विविध विद्यापीठे व राज्य सरकारांशी सामंजस्य करार केले आहेत. शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणाची गरज असल्याने शिक्षकांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com