ayodya verdict credit goes to lalkrushana adavani | Sarkarnama

  रामजन्मभूमी निकालाचे श्रेय अडवानींना : उमा भारती 

वृत्तसंस्था
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिराच्या निर्माणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आज स्वागत केले. 

रामजन्मभूमीच्या आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे मोठे योगदान असून, या माध्यमातून त्यांनीच भाजपच्या यशाचा पाया रचला आहे. त्यामुळेच भाजपला दुसऱ्यांदा जनादेश मिळालेला आहे, असेही त्या म्हणाल्या. रामजन्मभूमी आंदोलनातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये उमा भारती यांचा समावेश होता. 

उमा भारती यांनी सांगितले, की न्यायालयाच्या निकालानंतर आपण अडवानी यांची भेट घेऊन त्यांच्या पायावर माथा टेकविला. या आंदोलनाला गती देण्याचे काम विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते दिवंगत अशोक सिंघल यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख