....तर मोदींनी जबाबदारी स्वीकारली असती का?

ढग आल्याचा फायदा घेऊन भारतीय हवाईदलाने बालाकोट हल्ला केला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. वास्तविक युद्ध आणि हवामान यांचा जवळचा संबंध आहे. याच खराब हवामानामुळे भारतीय हवाई दलाने डागलेली क्षेपणास्त्रे अंदाज चुकून नागरी वस्तीवर पडली असती तर बालाकोटच्या हल्ल्याचे श्रेय घेणाऱ्या मोंदींनी त्याची जबाबदारी स्वीकारली असती काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
....तर मोदींनी जबाबदारी स्वीकारली असती का?

ठाणे : ढग आल्याचा फायदा घेऊन भारतीय हवाईदलाने बालाकोट हल्ला केला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. वास्तविक युद्ध आणि हवामान यांचा जवळचा संबंध आहे. याच खराब हवामानामुळे भारतीय हवाई दलाने डागलेली क्षेपणास्त्रे अंदाज चुकून नागरी वस्तीवर पडली असती तर बालाकोटच्या हल्ल्याचे श्रेय घेणाऱ्या मोंदींनी त्याची जबाबदारी स्वीकारली असती काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

याबाबत डाॅ. आव्हाड म्हणाले, "बातम्यांच्या हवाल्याने सांगायचे झाले तर एकूण 12 मिराज विमानांनी हा हल्ला केला होता. त्यापैकी 6 विमानांवर "क्रिस्टल मेझ" हे अत्याधुनिक इस्रायली मिसाईल होते जे अचूक वेध घेऊ शकते आणि हल्ल्याचा live व्हिडीओ बनवू शकते. उरलेल्या 6 विमानांवर "स्पाईस 2000" मिसाईल होते, जी तितकी संहारक नाहीयेत. खराब हवामानात विमान जरी उडू शकत असले तरी visibility कमी असल्याने किंवा वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे भारतीय सैन्याला "क्रिस्टल मेझ" क्षेपणास्त्रे वापरताच आली नाहीत. कारण मोठ्या क्षमतेची ही क्षेपणास्त्रे अतिरेक्यांच्या तळाऐवजी नागरी वस्तीवरही आदळू शकली असती,''

प्राचीन काळापासून युद्ध कधी करावे आणि कधी करु नये याबाबत काही अलिखित अटी शर्ती आहेत, असे सांगून डाॅ आव्हाड यांनी युद्ध व हवामानाचा संबंध दाखवणारी चार उदाहरणे सांगितली...ती अशी

१. महाभारतात कर्णाचा वध अर्जुनाने कसा केला, तर त्यावेळी शल्य कर्णाच्या रथाचे सारथ्य करत होता. पठारावर उभ्या असलेल्या कर्णाला पुढे जायचे होते. पुढे चिखल असल्याने रथ पुढे जाऊ शकणार नाही, हे सांगून शल्य कर्णाला रोखू पहात होता. पण कर्णाने त्याचे न ऐकता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम म्हणून कर्णाच्या रथाचे चाक चिखलात फसले आणि त्यावेळी अर्जुनाने कर्णाचा वध केला."

 २. 'वाॅटर्लू'ची लढाई. नेपोलिअन बोनापार्ट हा मोठा योद्धा होता. त्याचे सामर्थ्य प्रचंड होते. समोर ड्यूक आॅफ वेलिंग्टन आपल्या लहान सैन्यासह आणि छोट्या शस्त्रसाठ्यासमोर उभा होता. तो उंच टेकडीवर उभा राहून दोन दिवस फक्त आभाळाकडे पहात होता. दोन दिवसांत पावसाला सुरुवात झाली आणि नेपोलियनला आपली शस्त्रसामग्री हलवणे शक्य झाले नाही. ड्यूक आॅफ वेलिंग्टनने वरुनच नेपोलिअनच्या सैन्यावर तोफा डागल्या आणि नेपोलिअनला पराभव पत्करावा लागला.

३.  हिटलरने रशियाच्या लेनिनग्राडमध्ये घुसायचे ठरवले. हवामानाचा विचार न करता त्याने आक्रमणाला सुरुवात केली. रशियाचा स्टॅलिन युद्धनिती निपूण होता. त्याने जर्मनीच्या सैन्याला आत येऊ दिले. याच ब्लिल्टसकर्ग तंत्राने आतापर्यंत जर्मनीने आपली आक्रमणे यशस्वी केली होती. मात्र, १९४१ च्या त्या कडक हिवाळ्यात जर्मनीचे सैन्य गारठले आणि त्या थंडीलाच 'जनरल विंटर्स' हे नाव दिले. 

४. भारत -पाकिस्तान यांच्यात झालेले १९७१ च्या बांगलादेश युद्ध. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानवर आक्रमणाचा निर्णय घेतला होता. मात्र, पावसाळ्यानंतरच्या काळात अनुकूल हवामान होईपर्यंत वाट पाहण्याचा जनरल माणेकशाँ यांचा निर्णय इंदिरा गांधी यांनी मान्य केला. पुढे हवामान अनुकूल झाल्यानंतरच भारतीय सैन्याचे पाकिस्तानवर आक्रमण केले आणि इतिहास घडला. 

ही उदाहरणे देऊन डाॅ. आव्हाड यांनी मोंदी यांच्या ढगाळ हवामानाच्या 'थेअरी' बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. कुठलेही युद्ध असो, कुणाही राष्ट्राला नागरी वस्तीवर आक्रमण करता येत नाही, असे असताना बालाकोटच्या हल्ल्याच्या वेळी जर चुकून भारतीय क्षेपणास्त्रे तिथल्या नागरी वस्तीवर पडली असती, तर त्याचे परिणाम काय झाले असते व मोदींनी त्याची जबाबदारी स्वीकारली असती का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com