कॉंग्रेसच्या लाडांकडून शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार; निलेश राणेंचा आरोप 

कॉंग्रेस पक्षाचे नेते अविनाश लाड शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर बाईत यांचा प्रचार करीत असल्याचा आरोप माजी खासदार आणि भाजपचे नेते नीलेश राणे यांनी लांजा येथील पत्रकार परिषदेत केला आहे.
Nilesh Rane Allegation on Congress Leader Avinash Lad
Nilesh Rane Allegation on Congress Leader Avinash Lad

लांजा :  कॉंग्रेस पक्षाचे नेते अविनाश लाड शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर बाईत यांचा प्रचार करीत असल्याचा आरोप माजी खासदार आणि भाजपचे नेते नीलेश राणे यांनी लांजा येथील पत्रकार परिषदेत केला आहे.

कॉंग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांना तिलांजली देऊन शिवसेनेसाठी आणि पर्यायाने शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर बाईत यांचा प्रचार करून भाजपच्या उमेदवाराच्या मतांची विभागणी करण्याचा अविनाश लाड यांचा डाव आहे. मात्र तो हाणून पाडला जाईल, असा इशारा श्री. राणे यांनी दिला आहे. 

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्री. राणे हे सोमवारी लांजा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री. राणे म्हणाले की, लांजा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपला चांगले वातावरण आहे. नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून अॅड. सुमंत वाघधरे हेच विजयी होतील. तसेच 13 जागांवरील सर्व नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास श्री. राणे यांनी व्यक्त केला. विरोधकांनी कितीही वल्गना केली तरी लांजा नगरपंचायतीवर भाजपचीच सत्ता येणार, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी प्रसाद पाटोळे, सुमंत वाघधरे, तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, जिल्हा नेते मुन्ना खामकर आदी उपस्थित होते.

रुपेश गांगणांचा भाजपशी संबंध नाही

''निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी रुपेश गांगण हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाशी त्यांचा काही संबंध नाही. मात्र तरीही ते आपण भाजपचे असल्याचे सांगून मतदारांची दिशाभूल करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मतांचा विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला जाईल,'' असा इशारा श्री. राणे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com