Avdhoot Tatkare says he will make political explosion In Shriwardhan | Sarkarnama

श्रीवर्धनमध्ये राजकीय धमाका करणार : अवधूत तटकरे 

सरकारनामा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

कोलाड  :मातोश्री वरील कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे गर्दी करता आली नाही. मात्र आता श्रीवर्धन मतदारसंघात राजकीय धमाका करणार आहे, असा सूचक इशारा  माजी आमदार अवधूत तटकरे दिला.

मातोश्रीवर तालुक्‍यातील मातब्बर कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांचे पैकी कोणीही उपस्थित नव्हते, याबाबत त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली . 

तर काका खासदार तटकरे आणि कुटुंबियांच्यात कोणता वाद आहे, यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. विधानसभा निवडणूक प्रचारात वेळ आली तर त्यावर नक्कीच बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणात कधीही ठरवून काही होत नाही. परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे लागतात. वरिष्ठांच्या सल्ल्यामुळे अनेक महिने धुसफुस रोखून ठेवली, असे स्पष्टीकरण श्रीवर्धचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी  दिले. शिवसेना प्रवेश नाट्यानंतर हे स्पष्टीकरण दिले. श्रीवर्धन मतदार संघात राजकीय धमाका करणार, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नाराजीबाबत चर्चा केली आहे. त्यांनी मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या सल्ल्यामुळेच थांबलो होतो. शिवसेना भाजपाच्या युतीच्या घोषणेनंतर पुढील निर्णय घेणार आहे. शिवसेनेत विनाअट प्रवेश केला आहे. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये उमेदवारीचा दावा करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख