जुन्या आखाडाचे महंत आचार्य राजेंद्र शुक्ला उर्फ अवधूत बाबा यांचा पक्षात जाहीर प्रवेश 

नवी दिल्ली : 'गंगा नदी वाचवा' संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर भारतात लोकप्रिय असणारे समाजसेवक आणि जुना आखाड्याचे महंत आचार्य राजेंद्र शुक्ला उर्फ अवधूत बाबा यांनी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात आज नवी दिल्ली येथे जाहीर प्रवेश केला. महंत राजेंद्र शुक्ला उर्फ अवधूत बाबा उत्तर भारतात लोकप्रिय समाजसेवक असून संपूर्ण देशात त्यांचा चाहता वर्ग आहे.त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्याने रिपाइंच्या संघटना वाढीत उत्तर भारतात मोठी मदत होईल असे सांगत आठवले यांनी महंत राजेंद्र शुक्ला उर्फ अवधूत बाबा यांचे रिपब्लिकन पक्षात स्वागत केले.

नवी दिल्लीतील 11 सफदर जंग रोड येथील निवासस्थानी महंत राजेंद्र शुक्ला उर्फ अवधूत बाबा यांनी रिपाइंचे पक्षसदस्यत्व स्वीकारले. महंत राजेंद्र शुक्ला अवधूत बाबा हे गंगा नदी वाचवा संस्थे चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भारतीय ज्योतिष सेवा संस्थान; मानव मोक्ष मंदिर ; या सह अनेक सामाजिक काम करणाऱ्या सेवा संस्थांशी ते संबंधित आहेत. महंत राजेंद्र शुक्ला अवधूत बाबा यांचा देशभर चाहता वर्ग आहे. समाजातील दलित आदिवासी बहुजन समाजाच्या सेवेसाठी मदतीसाठी आपले समाजकार्य सुरू असून या वर्गाच्या  राजकीय हक्काची लढाई केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले लढत असून दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष एकमेव पक्ष असल्याची आपली खात्री पटल्यानेच आपण आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे अवधूत बाबा यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com