रिक्षाचालकाला मंत्री केले, आणखी काय हवे? : चंद्रशेखर बावनकुळे

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपचीउमेदवारी नाकारण्यावरून सुरू झालेले नाट्य संपलेले नाही. अडानी उद्योगसमूहाला मदत न केल्याची शिक्षा त्यांना मिळाल्याचा आरोप काॅंग्रेसने केला आहे. दुसरीकडे माझ्यासारख्या रिक्षाचालकाला मंत्री केले, यापेक्षा आणखी काय हवे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
रिक्षाचालकाला मंत्री केले, आणखी काय हवे? : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : एका सामान्य ऑटो चालकाला जिल्हा परीषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

कामठी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने यावेळी आपल्याला संधी नाकारली, याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे या मुद्यावरून काॅंग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. त्यांचे तिकिट दिल्लीत कटल्याचा आऱोप प्रवक्त सचिन सावंत यांनी केला. त्यात अडानींच्या प्रकल्पाला मदत न केल्याचा फटका बसल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

बावनकुळे म्हणाले कीपक्षाने मला कामठी मतदारसंघातून तीन वेळा आमदार केले. दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री केले. पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तो मान्य आहे. मी विदर्भात पक्षासाठी काम करावे, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. त्यामुळे नाराज असण्याचे काहीही कारण नाही. काटोल हा माझ्यासाठी पर्याय होता. मात्र मी तिथून लढलो असतो तर तेथील कार्यकर्त्यावर अन्याय झाला असता, अस त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला माझ्या मोठ्या भावासारखे तर नितीन गडकरी वडीलांसारखे आहेत. त्यांच्या नेतृत्वात मला काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून यापुढेही मी काम करीत राहणार आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. पूर्व विदर्भात विधानसभा निवडणुकीत मला काम करता येईल, त्यामुळे मला पक्षाने उमेदवारी दिली नाही. माझ्या पत्नीने अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला नाही. त्याला एबी फार्म नसल्यामुळे तो तसाही बाद होणारच होता, असेही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com