शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो, पवारांनी राज्यपालांवर पुन्हा साधला निशाणा.. - Words are enough for a wise person, Pawar aims at the governor again | Politics Marathi News - Sarkarnama

शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो, पवारांनी राज्यपालांवर पुन्हा साधला निशाणा..

सयाजी शेळके
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

राज्यपालांनी मुख्यमंत्र्याविषयी केलेली भाषा पदाची प्रतिष्ठा वाढविणारी नाही. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा ठेवली जात नसेल तर तेही चुकीचे आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री जर याबाबात स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत असतील आणि त्यानंतरही ते त्याच जागेवर बसणार असतील ल तर त्यांनी बसावे,

उस्मानाबाद ः `शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो` असे म्हणत माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी पाठवलेले पत्र आणि त्यात वापरलेली भाषा यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली. तोच धागा पकडत पवारांनी राज्यपालांना चिमटा काढला.

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार पवार यांनी दोन दिवसांचा जिल्हा दौरा केला. यावेळी खासदार पवार यांनी तुळजापूरमध्ये (ता. १९) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर चांगलीच झोड उडविली. राज्यपाल महोदयांच्या पत्रकारांच्या प्रश्नावर खासदार पवार यांनी सविस्तर उत्तर दिले.

पवार म्हणाले, मी १९५७ पासूनचे सर्वच राज्यपाल पाहिले आहेत. १९६७ पासून प्रत्येक राज्यपालांचा थेट संबंध आला आहे. राज्यामध्ये या पदाला एक वेगळे महत्व आहे. सर्वांनीच या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे राज्यपाल पद महत्वाचे आहे, त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री हे पदही महत्वाचे आहे. त्याचीही प्रतिष्ठा राज्यापालांनी राखली पाहिजे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्याविषयी केलेली भाषा पदाची प्रतिष्ठा वाढविणारी नाही. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा ठेवली जात नसेल तर तेही चुकीचे आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री जर याबाबात स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत असतील आणि त्यानंतरही ते त्याच जागेवर बसणार असतील ल तर त्यांनी बसावे, पण, ज्यांना थोडाजरी सेन्स आहे, असा माणूस या जागेवर बसणार नाही,  मराठी भाषेत एक म्हण आहे,`शहाण्याला शब्दांचा मार` पुरेसा असतो, असे म्हणत पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख