पत्नीची प्रसुती महापालिकेच्या रुग्णालयात; जिल्हाधिकाऱ्यांचा समाजापुढे आदर्श 

विशेष म्हणजे त्यांनी सुरुवातीपासूनच पत्नीवर महापालिकेच्या रुग्णालयातच उपचार घेतले. इटनकर यांच्या पत्नी देखील डॉक्टर असल्याने यो दोघांनीही महापालिकेच्या रुग्णालयातच प्रसुतीचा निर्णय घेतला. या दामपत्याने दाखवलेला विश्वास आणि केलेली कृती यामुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे एवढे मात्र निश्चित.
Nanded collectors wifes news
Nanded collectors wifes news

नांदेड ः सरकारी उच्चपदस्थ अधिकारी म्हटलं की त्यांचा बडेजाव, दिमतीला नोकर-चाकर आणि आजारपण किंवा वैद्यकीय उपचारांची वेळ आलीच तर महागड्या दवाखान्यांमध्ये ट्रीटमेंट असे चित्र आपल्याला पहायला मिळते. पण नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मात्र हा समज चुकीचा ठरवला आहे. त्यांनी आपल्या पत्नीची प्रसुती चक्क महापालिका रुग्णालयात करवून घेत सरकारी रुग्णालयांवर अविश्वास दाखवणाऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अंजन घातले आहे. इटनकर यांना काल कन्यारत्न प्राप्त झाले असून पत्नीची प्रसुती शासकीय रुग्णालयात करवून घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्नीची प्रसुती महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात केली. काल त्यांच्या घरात कन्यारत्नाच्या रुपाने लक्ष्मी आली. मुलगी झाल्याचा आनंद तर आहेच, पण त्याही पेक्षा कौतुक इनटकर दामपत्यांचे यासाठी की त्यांनी प्रसुतीसाठी मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरातील महागडे किंवा चकचकीत हॉस्पीटल निवडले नाही, तर चक्क महापालिकेच्या रुग्णालयातच प्रसुतीचा निर्णय घेतला. कोरोनाचे जागतिक संकट, त्यात नांदेड जिल्ह्यात या संसर्गाने चांगलेच तोंड वर काढले आहे.

अशावेळी मनात आणले असते तरी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या पत्नीला मोठ्या शहरातील हॉस्पीटलमध्ये दाखल केले असते. परंतु ज्या शासकीय यंत्रणेचा ते एक भाग आहे, त्यांनीच जर असे केले असते तर तो यंत्रणा व शासकीय आरोग्य व्यवस्थेवर अविश्वास ठरला असता. पण तसे न करता इटनकर यांनी आपल्या पत्नीला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आणि काल त्यांना गोंडस कन्यारत्न प्राप्त झाले. बाळ आणि बाळाची आई दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टारांनी सांगितले आहे.

डॉ. विपीन इटनकर हे सहा महिन्यांपूर्वी नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर प्रशासनात अधिक सुधारणा आणण्यासाठी त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवत स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर ही ते कायम योद्ध्याप्रमाणे रस्त्यावर उतरून लढा देत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्साठीच्या उपाययोजना, बैठका करतांना घरात गर्भवती असलेल्या पत्नीची देखील ते काळजी घेत होते.

विशेष म्हणजे त्यांनी सुरुवातीपासूनच पत्नीवर महापालिकेच्या रुग्णालयातच उपचार घेतले. इटनकर यांच्या पत्नी देखील डॉक्टर असल्याने यो दोघांनीही महापालिकेच्या रुग्णालयातच प्रसुतीचा निर्णय घेतला. या दामपत्याने दाखवलेला विश्वास आणि केलेली कृती यामुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे एवढे मात्र निश्चित.

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com