भाजप आमदारासह सगळ्या कुटुंबालाच कोरोनाची लागण

रविवारी (ता.९ ) परत ठाकुर यांच्या परिवारातील काहीसदस्य व संपर्कातील सर्वांचे आरटीपीसीआरकरण्यात आले. यात परिवारातील आणखी तीन व संपर्कातील तिघांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत.आमदार ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांचीप्रकृती चांगली आहे.
bjp mla sujeet singh thackur and his family infected corona news
bjp mla sujeet singh thackur and his family infected corona news

परांडा ः भाजपचे सरचिटणीस तथा विधान परिषदेतील आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. काही दिवसांपासून ठाकूर यांच्या मातोश्री आजारी होत्या. त्यामुळे मंगळवारी (ता.४) ठाकूर यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची अॅन्टीजन टेस्ट करून घेतली. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वांनाच कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. कुटुंबातील सर्वांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण व मृतांची संख्या वाढली आहे. अधिकाधिक अॅन्टीजन टेस्ट करून पाॅझीटीव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्याकडे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणाचा प्रयत्न सुरू आहे. यातच आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे अख्खे कुटुंबच कोरोना पाॅझीटीव्ह निघाल्याने प्रशासन हादररून गेले आहे.

रविवारी ( ता.९ ) परत ठाकुर यांच्या परिवारातील काही  सदस्य व संपर्कातील सर्वांचे आरटीपीसीआर करण्यात आले. यात परिवारातील आणखी तीन व संपर्कातील तिघांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. आमदार ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रकृती चांगली आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर सुजितसिंह ठाकूर यांनी स्वतः याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना दिली. मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. काळजीपोटी अनेकांचे काॅल येतात. पण सर्व काॅल घेणे शक्य नाही, त्याबद्दल क्षमस्व असल्याचे सांगत कृपया काही महत्अवाचे काम असल्यास एसएमएसद्वारे कळवावे, मी उपलब्ध असेल असे आवाहनही त्यांनी केले.

माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. आम्ही सर्व बरे होऊत.लवकरच घरी येऊ.सेवा हाच संकल्प घेऊन पुन्हा आपल्यासाठी सक्रीय होईन, असेही ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com